---Advertisement---
सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२६ च्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित महिलांची भव्य बाईक रॅली शनिवारी (११ एप्रिल) उत्साहात पार पडली.
काव्यरत्नावली चौकात माजी उपाध्यक्ष भारती रंधे आणि उपाध्यक्ष संध्या तायडे यांनी झेंडा दाखवून रॅलीला प्रारंभ करून दिला. रॅलीत निलू इंगळे, आशा अंबोरे, लक्ष्मी कुमावत, प्रतिभा घोडेस्वार, काजल वाघ, आशा मौर्य, पल्लवी भोगे पाटील, कविता सपकाळे, मनीषा सपकाळे यांसह मोठ्या संख्येने महिलांनी सहभाग नोंदवला.
उन्हाच्या तडाख्यातही सर्व महिलांनी उत्साहाने सहभाग घेत घोषणाबाजी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. त्यानंतर महात्मा फुले मार्केट येथे क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली.
ही रॅली अत्यंत शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली असून, सहभागी सर्व महिलांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.









