---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील कुसुंबे खुर्द गावातील तरुणांनी मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बेरोजगारीवर मात करत शासकीय सेवेत स्थान मिळवून गावाचा मान राज्यभर उंचावला आहे. MPSC, पोलीस भरती तसेच विविध महामंडळांमध्ये निवड होऊन अनेक तरुणांनी यश संपादन केले.
या यशस्वी तरुणांचा कुटुंबियांसह गावात सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी उपसरपंच प्रमोदभाऊ घुगे आणि त्रिमूर्ती मित्रमंडळाच्या सदस्यांनी केले होते. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीताने करण्यात आली.
यावेळी निवड झालेल्या तरुणांनी आपल्या यशाचा प्रवास आणि अनुभव मनोगतातून मांडले. उपस्थितांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे आभार अध्यक्ष निर्मल पाटील यांनी मानले. तसेच महेश पाटील, बबलू पाटील, कैलास फेगडे, योगेश फेगडे, महेश महाजन, गणेश मिस्त्री, कृष्णा सोनवणे, चंदू पाटील, चेतन पाटील, भावेश पाटील, अक्षय राजपूत, राजेश्वर चिंचोले, खुशाल अहिरे आदींसह सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.









