---Advertisement---
महाराष्ट्रासाठी पुढील 72 तास अर्थात तीन दिवस अत्यंत धोक्याचे असून उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यावेळी तापमानाचा पार हा 45 अंशांच्या पुढे जाण्याची ही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा हा मोठ्या प्रमाणात वाढला असून सगळीकडे सूर्य हा आग ओकताना दिसत आहे. राज्यातील विविध भागात तापमान हा 40° पार गेला आहे. तर पुढील तीन दिवस राज्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे असून विदर्भासह मध्यमहाराष्ट्र कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राला तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान 18 एप्रिल पासून राज्यावर अवकाळी पावसाचा संकट देखील घोंगावत असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे.
सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान हे अकोला जिल्ह्याच नोंदवलं गेलं असून अकोल्यात 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, यासह अमरावतीत 43.8 अंश सेल्सिअस तर वर्धा येथे 43.5 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भाला आजपासून पुढील दोन दिवस उष्णतेचा ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
यासह दक्षिण महाराष्ट्र व कोकणातील सोलापूर, सांगली, कोकण आणि गोवा परिसरात ही पुढील दोन दिवस हा उष्णतेच्या लाटेचा जारी करण्यात आलेला असून उत्तर महाराष्ट्र व मराठवाडा मधील जळगाव 42.5 अंश सेल्सिअस तर परभणी हे 42.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात उन्हाच्या कडाक्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार असून येत्या 18 एप्रिल पासून पुढील तीन ते चार दिवस राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे. त्यामुळे उखाड्याने हैरान झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. मराठवाडा, विदर्भ आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असून काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य खबरदारी घ्यावी असं आवाहन कृषी विभागाने केले आहे.
दरम्यान राज्यात पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता असून दुपारी 12 ते 4 यावे शक्यतो काम नसेल तर घराबाहेर जाणे टाळा, सुती कापड किंवा पांढरे कापड परिधान करा, भरपूर पाणी प्या रसाळ फळ खा, तसंच छत्री किंवा टोपीचा वापर करा आणि उष्माघाताची लक्षणे जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा असा आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.









