बहिणाबाई मार्टला CEO करिश्मा नायर यांची भेट; महिला बचत गटांच्या उत्पादनांचे कौतुक

---Advertisement---

 

जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी शहरातील कोंबडी बाजार परिसरात उभारण्यात आलेल्या ‘बहिणाबाई मार्ट’ला भेट देत तेथील कामकाजाची पाहणी केली.
जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी अल्प बचत भवनात ‘बहिणाबाई मार्ट’ सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर नायर यांनी मार्टमधील विविध स्टॉल्सना भेट देऊन विक्रीस ठेवलेल्या वस्तूंची सविस्तर पाहणी केली.


यावेळी त्यांनी महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. तसेच उत्पादनांचे पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि विपणन अधिक प्रभावी करण्यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.
महिला बचत गटांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि व्यवसाय अधिक सक्षम करण्यासाठी मार्गदर्शन केले. महिला सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांना अधिक चालना देण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.


या प्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे, हरीश भोई, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---