गॅस टंचाईचा संताप; सिलेंडर न मिळाल्याने ग्राहकाने फोडले स्वतःचे डोके

---Advertisement---

 

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी, दि. १६ एप्रिल २०२६) – गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे त्रस्त झालेल्या एका ग्राहकाने संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतल्याची धक्कादायक घटना वाळूज परिसरात घडली आहे. या प्रकारामुळे नागरिकांमधील नाराजी पुन्हा एकदा समोर आली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, रांजणगाव शेपू येथील कमल गॅस एजन्सीसमोर गुरुवारी ही घटना घडली. बालचंद नेमाने (वय ५०) हे गेल्या अनेक दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरसाठी एजन्सीच्या चकरा मारत होते. मात्र, वारंवार प्रयत्न करूनही गॅस उपलब्ध न झाल्याने ते संतप्त झाले. “घरी बायकोला काय सांगू?” असे म्हणत त्यांनी संतापाच्या भरात स्वतःचे डोके फोडून घेतले.
या घटनेनंतर एजन्सीबाहेर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीस उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले.


दरम्यान, इंधन टंचाईमुळे देशभरात गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे चित्र असून, ग्राहकांना अजूनही सिलेंडरसाठी रांगा लावाव्या लागत आहेत. शासनाकडून पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जात असला, तरी प्रत्यक्षात नागरिकांची गैरसोय कायम असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---