---Advertisement---
जळगाव : भगवान श्री परशुराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात शहरात साजरा केला जाणार आहे. रविवारी (१९ एप्रिल) दुपारी सुभाष चौकातून दिव्य परशुराम रथालसह विराट शोभायात्रेला सुरुवात होईल. रात्री नऊ वाजता शिवतिर्थ मैदानावर महाआरती होईल. परशुराम आर्थीक विकास महामंडळाचे अध्यक्ष ना. कॅप्टन आशीष दामले तसेच ब्राम्हण संघर्ष समितीचे मुख्य समन्वय अर्चना सुरूडकर यांची याप्रसंगी विशेष उपस्थिती असणार आहे.
बहुभाषिक ब्राम्ह्णण संघ अध्यक्ष ॲड. ओम त्रिवेदी, बहुभाषिक ब्राम्हण महिला मंडळाच्या अध्यक्षा पूनम तिवारी यांच्या पुढाकाराने भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचे यंदा १७ वे वर्षे आहे. ब्राम्हण एकता मेळावा यशस्वीतेसाठी ५०० हुन अधिक स्वयंसेवक परिश्रम घेताहेत. दानशुरांच्या मदतीने हे आयोजन यशस्वी केले जात आहे, अशी माहिती अध्यक्ष ओम त्रिवेदी यांनी दिली.
दुपारी शोभायात्रा
ब्राह्मण एकता दिवसाचा मुख्य आयोजनात रविवारी (१९ एप्रिल) दुपारी ४.३० वाजता सुभाष चौकातुन पारंपारीक वेशभुषा विवीध पागडी साफे परिधान करून भगव्याध्वजांसह शोभायात्रेला सुरुवात होईल. भगवान परशुराम रथा सह अजेय अपराजित योद्धा बाजीराव पेशवा ढोल पथक व राणी लक्ष्मीबाई लेझीम पथक, माता रेणुका दांडीया पथक सहभागी होतील. वाजतगाजत धुम धडाक्याने हजारोंच्या सहभागाने विराट अशी शोभायात्रा निघेल. महिलांचे तलवार बाजी दांडपट्टा प्रात्यक्षिके शोभायात्रेचे आकर्षण ठरणार आहे. पथकांच्या सरावाला हनुमान जयंती पासुन सुरूवात होते. विराट शोभायात्रेचे समापन शिवतिर्थावर होईल. यावेळी दादा महाराज जोशी यांचे आशिर्वचन होईल.
याप्रसंगी आयएएस आकाश त्रिवेदी, ब्रह्म चैतन्य गुरुकुलम् चे गढीकर गुरूजी, स्विकृत सदस्य सुभाष शौचे यांचा सत्कार करण्यात येईल. तसे सर्व शाखा व समाज मंडळाचे अध्यक्ष व ११ देणगीदार हजाराहून अधिक व्यासपिठावर स्थानापन्न होतील.
यंदा तब्बल २८ पानी मराठी नववर्ष दिनदर्शिका शास्त्र शुद्ध तिथिसह प्रकाशित करण्यात आली आहे. दिनदर्शिकत सर्व ब्राह्मणांच्या मुळ कुळ पुरूषाची माहीती प्रकाशीत केली आहे. ज्यांच्या पासुन प्रत्येक शाखेची उत्पत्ती माहिती यात आहे. अनेक समाजोपयोगी माहीती दिनदर्शिकत समाविष्ट आहे. प्रसिध्दी प्रमुख मनीष पात्रीकार यांनी ही माहिती दिली.









