मित्राचे भांडण सोडविणाऱ्या तरुणावर तलवारीने वार; त्रिकुटाची मारहाण

---Advertisement---

 

जळगाव : मित्राचे भांडण सुरू होते. समजुतीने ते सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणावर संशयिताने तलवारीने कपाळावर वार केला. अन्य दोघांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. शनिवारी (१८ एप्रिल) रात्री साडेआठ ते नऊ वाजेच्या सुमारास ही घटना अक्सानगर मिल्लत शाळा परिसर नाल्याजवळ घडली.

यांच्या शेख ईस्माईल शेख शेख असगर (वय २५, रा. छोटी मिल्लत शाळेजवळ अक्सानगर, मेहरुण) तक्रारीनुसार, त्याचा मित्र अल्तमश याच्याशी वाद सुरु होता. हा प्रकार कळताच शेख ईस्माईल धावत गेले. आणि भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. या मध्यस्थीबद्दल त्रिकुटास राग आला. एका संशयिताने शेख ईस्माईल या तरुणाच्या कपाळावर तलवारीने वार केला. साथीदार अन्य संशयिताने लाकडी दांड्याने तसेच एकाने शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिघांच्या हल्ल्यात शेख ईस्माईल शेख गंभीररित्या जखमी झाले.

घटना कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड हे घटनास्थळाकडे रवाना झाले. जखमी तरुणाच्या तक्रारीनुसार याप्रकरणी शहाबाज उर्फ नगिना, तौसिफ पाशा उर्फ बिहारी, उजेर पिरजादा (सर्व रा. जळगाव) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे तपास करीत आहेत. ठाण्यात

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---