---Advertisement---
महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने भारतीय पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश काढलेले आहेत. काढलेल्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली असून त्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगाव जिल्ह्याच्या नूतन पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आलेली असून लवकरच ते पदभार स्वीकारणार आहेत.
राज्यात एकूण 9 पोलीस अधीक्षकांची परस्पर बदली करण्यात आली असून यात,
1.पुणे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांची साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
2.पुणे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिमच्या पोलीस अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
3.जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची पुण्याच्या सीआयडी विभागात पोलीस अधीक्षक पदी निवड करण्यात आली आहे.
4.साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांचे सांगलीच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 5.सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचे मुंबई राज्य गुप्त वार्ता विभागात पोलीस उपायुक्त पदी निवड करण्यात आली आहे.
6.कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांची गडचिरोली परिक्षेत्रात पोलीस उपमहानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
7.गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
8.गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. रमेश यांची गडचिरोलीच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
9.धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची जळगावच्या पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.









