जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळ भामट्यांचा थरार, महिलेच्या गळ्यातून मंगलपोत ओढत दुचाकीने फरार

---Advertisement---

 

जळगाव : उद्यानावरुन रस्त्याच्या कडेने ज्येष्ठ महिला पायी घरी जात होत्या. विरुध्द दिशेने दुचाकीने आलेल्या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगलपोत ओढत सुसाट वेगाने पलायन केले. बुधवारी (१५ एप्रिल) संध्याकाळी ही घटना शहरातील जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाजवळ ही घटना घडली.

निलीमा विश्वासराव पाटील (वय ६६, रा. प्लाट नं. १० अ, छावा खान्देश मिल कॉलनी रिंगरोड या ठिकाणी कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्या सेवानिवृत्त असुन भाऊंच्या उद्यान परिसरात त्या आलेल्या होत्या. संध्याकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास त्या भाऊंच्या उद्यानावरुन घरी जाण्यास निघाल्या.

काव्यरत्नावली रामानंदनगर मार्गान त्या चालक जात असताना जिल्हाधिकारी यांच्या निवासस्थानाजवळ त्या महिलेच्या विरुध्द दिशेने दोन अनोळखी इसम दुचाकीने त्यांच्याजवळ आले. दुचाकीवरील चालक सावकाश दुचाकी नेत होता. मागे बसलेल्या त्याच्या साथीदाराने महिलेच्या गळ्यातील मंगलपोत जबरीने ओढली. महिलेने आरडाओरड केली असता पोत हातात येताच पुढच्या त्याच्या साथीदाराने वेगाने दुचाकी पळवित दोघे या परिसरातून पसार झाले.

माहिती कळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांनी घटनास्थळी जावुन प्रकार जाणुन घेतला. तक्रारीनुसार तक्रारीनुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे तपास करीत आहेत.

बसमध्ये चढताना पोत लंपास

जळगाव बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत भामट्याने महिलेकडील सोन्याची पोत लंपास केली. बुधवारी (१५ एप्रिल) दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही घटना पाचोरा बसस्थानकावर पाचोरा ते जळगाव जाणाऱ्या बसमध्ये ही घटना घडली. जयश्री स्वप्नील पाटील (वय २२, रा. विवेकानंद कॉलनी, भडगाव) या गृहिणी पेपर संपवुन आसनखेडा येथे जाण्यासाठी पाचोरा बसस्थानकात बसच्या प्रतिक्षेत होत्या. पाचोरा जळगाव बस मध्ये त्या चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्याजवळील सुमारे ३० हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरुन नेली. महिलेने शोध घेतला असता मंगलपोतचा तपास लागला नाही. तक्रारीनुसार याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हवालदार श्रीकांत गायकवाड हे तपास करीत आहेत.

गर्दीत घाई नको

बसमध्ये चढण्यासाठी दरवाजाजवळ प्रवाशी नेहमी गर्दी करतात. या गर्दीतून लवकर चढण्याचा प्रयत्न महिला करतात. या संधीचा फायदा चोरटे पुरेपुर फायदा उचलण्याच्या तयारीत असतात. आपल्या मौल्यवान वस्तू, दागिने तसेच पैशांची खबरदारी महिलांनी घ्यावी. गृहिणी, ज्येष्ठ आणि वयोवृध्द महिलांच्या दागिन्यावर चोरट्यांचा डोळा असतो. आपल्या दागिन्यांची आपणच सुरक्षिता घेण्याची गरज आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---