भोंदू अशोक खरातला मोठा धक्का! जवळच्या व्यक्तीचा समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात मृत्यू; घात की अपघात?

---Advertisement---

 

राज्यात पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. समृद्धी महामार्गावर झालेल्या या अपघातात भोंदू खरातच्या जवळचे निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्या पत्नी व मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

अपघाताबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात धोत्रे गावाच्या परिसरात घडला. छत्रपती संभाजीनगर येथून शिर्डी कडे जात असताना जितेंद्र शेळके यांच्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार थेट कंटेनरखाली घुसली आणि वाहनाचा चक्काचूर झाला.

या अपघातात जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पत्नी काही काळ कारमध्ये अडकून असल्याची माहिती समोर आली. बचाव पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

मृत जितेंद्र शेळके हे भोंदू अशोक खरातच्या शिवनिक संस्थांनचे उपाध्यक्ष होते आणि ते अशोक खरात यांचे निकटवर्तीय मानले जात होते. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जितेंद्र शेळके यांच्या लॉन्समध्येही खरातची भागीदारी आहे. भोंदू अशोक खरातला अटक झाल्यापासून जितेंद्र शेळके हे तणावात होते.

दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी वेग आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरमुळे हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---