जळगावात JCL T-20 चा थरार; पाचोरा, चाळीसगाव व सातपुडा संघ विजयी

---Advertisement---

 

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 (जळगाव क्रिकेट लीग-2026) स्पर्धेत रोमांचक सामने रंगत आहेत. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रिकल्स सहप्रायोजित या स्पर्धेत सोमवारी पाचोरा एसकेटी योद्धाज व चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर यांनी विजय मिळवला, तर रविवारी सातपुडा हिरोजने दमदार कामगिरी केली.


पाचोरा संघाचा थरारक विजय
जळगाव कोगटा किंग्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 बाद 175 धावा केल्या. संघाची अवस्था 5 बाद 69 अशी बिकट असताना मनीष चव्हाण (नाबाद 58) व पूर्वेश चौधरी यांच्या 76 धावांच्या भागीदारीने डाव सावरला.
प्रत्युत्तरात पाचोरा एसकेटी योद्धाजने 176 धावांचे आव्हान 7 गडी राखत पूर्ण केले. कैलास पाटील (नाबाद 77) सामनावीर ठरला. शेवटच्या षटकात आवश्यक धावा सहज काढत पाचोराने विजय मिळवला. कोगटा किंग्सचा हा पहिलाच पराभव ठरला.


अमेय कोळीच्या खेळीने चाळीसगावचा विजय

जामनेर सातपुडा हिरोजने 20 षटकांत 7 बाद 158 धावा केल्या. रवींद्रने 68 धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरात चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजरने 19.3 षटकांत 6 बाद 162 धावा करत सामना जिंकला. अमेय कोळी (66) सामनावीर ठरला, तर साहिल गायकरने 46 धावांची साथ दिली. या विजयामुळे जामनेर संघाची विजयाची हॅटट्रिक हुकली.


सातपुडा हिरोजचा 68 धावांनी दणदणीत विजय
रविवारी झालेल्या सामन्यात सातपुडा हिरोजने 20 षटकांत 7 बाद 182 धावा केल्या. मितालेश चौधरी (नाबाद 70) चमकला.
प्रत्युत्तरात रावेर रॉयल्स 114 धावांवर आटोपले. सातपुडाने 68 धावांनी विजय मिळवला. मितालेश चौधरी सामनावीर ठरला.


मोठ्या पडद्यावर थेट प्रक्षेपण
काव्यरत्नावली चौक व नेहरू चौक येथे सामन्यांचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर करण्यात आले असून प्रेक्षकांची मोठी गर्दी होत आहे, अशी माहिती अध्यक्ष अतुल जैन यांनी दिली.


आजचे सामने (21 एप्रिल)
जळगाव कोगटा किंग्स विरुद्ध रावेर रॉयल्स – सकाळी 8.30
जामनेर सातपुडा हिरोज विरुद्ध अमळनेर सुहांस जायंट्स – दुपारी 3.00
पाचोरा एसकेटी योद्धाज विरुद्ध चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर – सायंकाळी 7.30


गुणतालिका (रात्री 8 पर्यंत)
जामनेर सातपुडा हिरोज – 3 सामने, 2 विजय, 4 गुण
जळगाव कोगटा किंग्स – 3 सामने, 2 विजय, 4 गुण
चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर – 2 सामने, 1 विजय, 2 गुण
पाचोरा एसकेटी योद्धाज – 2 सामने, 1 विजय, 2 गुण
अमळनेर सुहांस जायंट्स – 1 सामना, 0 विजय, 0 गुण
रावेर रॉयल्स – 1 सामना, 0 विजय, 0 गुण

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---