जळगाव पोलिसांना ‘आपत्ती प्रतिसाद किट’; प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

---Advertisement---

 

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि जळगाव जिल्हा पोलिस दल यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव पोलिस मुख्यालयात ‘आपत्ती प्रतिसाद किट’ (Disaster Response Kit) वितरण व प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
या कार्यशाळेत जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्ती काळात किटचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नैसर्गिक तसेच मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी या किटचा मोठा उपयोग होणार असल्याचे सांगण्यात आले.


सदर किटचे वितरण जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्या हस्ते, तसेच पोलिस अधीक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान अधिकाऱ्यांना विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची माहिती देण्यात आली.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO), विविध पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---