मोठी बातमी!इस्रायलच्या पंतप्रधानांना होऊ शकते कोणत्याही क्षणी अटक?

---Advertisement---

 

मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बेंजामीन नेतान्याहू यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. International Criminal Court (ICC) कडून जारी अटक वॉरंटच्या पार्श्वभूमीवर हंगेरीचे नवे पंतप्रधान Peter Magyar यांनी केलेल्या विधानामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे.
मॅग्यार यांनी स्पष्ट केले की, ICC चे अटक वॉरंट असलेली कोणतीही व्यक्ती हंगेरीत आली तर तिला तात्काळ अटक केली जाईल. हंगेरी हा ICC चा सदस्य देश असल्याने त्यांच्या या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याआधी नेतान्याहूंना हंगेरी दौऱ्याचे आमंत्रण देण्यात आले होते, मात्र या नव्या भूमिकेमुळे त्यांचा संभाव्य दौरा अडचणीत येण्याची शक्यता आहे.


दरम्यान, मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. इस्रायल-अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढत असून, दोन्ही बाजू आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत. या युद्धामुळे जागतिक स्तरावर चिंता व्यक्त केली जात आहे.
अनेक देशांकडून शांततेसाठी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू असले, तरी त्यांना अद्याप यश आलेले नाही. अशा परिस्थितीत हंगेरीसारख्या देशांच्या कठोर भूमिकेमुळे नेतान्याहू यांच्या आंतरराष्ट्रीय हालचालींवर मर्यादा येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---