---Advertisement---
वॉशिंग्टन/तेहरान, प्रतिनिधी – अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव पुन्हा एकदा निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील नाकेबंदी हटवण्यास नकार दिल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. दरम्यान, दोन्ही देशांतील तात्पुरता युद्धविराम बुधवारी रात्री संपणार असल्याने युद्धाची शक्यता वाढली आहे.
ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, ठोस कराराशिवाय इराणवरील बंदर नाकेबंदी हटवली जाणार नाही. या नाकेबंदीमुळे इराणचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा अमेरिकेकडून करण्यात आला आहे.
इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बघेर घालीबफ यांनी अमेरिकेवर टीका करत, “दबावाखाली इराण झुकणार नाही,” असा इशारा दिला. गेल्या काही दिवसांत इराणने युद्धासाठी तयारी वाढवली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जड पाकिस्तान दौऱ्यावर जाऊ शकतात. त्यांच्यासोबत विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जॅरेड कुशनरही सहभागी होण्याची शक्यता आहे. इराणचे शिष्टमंडळही चर्चेसाठी इस्लामाबादला येऊ शकते. मात्र, अमेरिकेचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित असतील तरच चर्चा होईल, अशी अट इराणने घातली आहे.
युद्धविरामाची मुदत संपण्याच्या उंबरठ्यावर; विस्ताराची शक्यता कमी
होर्मुज सामुद्रधुनीत जहाजांची हालचाल घटली
इराणी जहाज जप्त केल्याने तणाव वाढला
इस्रायल-लेबनॉन चर्चेची पुढील फेरी २३ एप्रिलला
दरम्यान, दोन्ही देशांतील तणाव निवळणार की युद्ध भडकणार, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.









