JCL T-20: जामनेर, जळगाव कोगटा किंग्स आणि अमळनेरचे विजय; उपांत्य फेरीसाठी चुरस वाढली

---Advertisement---

 

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व अलरीक इलेक्ट्रिकल्स सहप्रायोजित जळगाव क्रिकेट लीग २०२६ (JCL T-20) स्पर्धेचा थरार दिवसेंदिवस रंगतदार होत असून उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्व संघांमध्ये जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.
मंगळवारी झालेल्या सामन्यांत जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग्स यांनी दमदार विजय मिळवला. त्याआधी २० एप्रिल रोजी रात्री अमळनेर सुहांस जायंट्सनेही रावेर रॉयल्सवर मोठा विजय नोंदवला.


जामनेर सातपुडा हिरोजचा दणदणीत विजय
अमळनेर सुहांस जायंट्सविरुद्धच्या सामन्यात जामनेरने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. अमळनेरचा डाव सुरुवातीला डळमळीत झाला असला तरी शुभम शर्मा (६०), रोहित भोई (३२) आणि यशवंत शिंदे (२२) यांच्या खेळीमुळे संघाने १९.५ षटकांत १५२ धावा उभारल्या.
प्रत्युत्तरात जामनेरने आक्रमक सुरुवात करत १७.४ षटकांत ८ गडी राखून लक्ष्य गाठले. प्रद्युम महाजनने ६९ धावांची शानदार खेळी करत सामनावीर पुरस्कार पटकावला. रवींद्र (३१) आणि क्रिषी (३०) यांनी नाबाद भागीदारी करत विजय निश्चित केला.
जळगाव कोगटा किंग्सचा सलग विजय
रावेर रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रावेरचा डाव २० षटकांत १४३ धावांवर मर्यादित राहिला. अशपाक शेखने ४५ धावा करत लढत दिली.
जळगाव कोगटा किंग्सने १४४ धावांचे लक्ष्य १५.१ षटकांत ३ गडी गमावून पूर्ण केले. ओम भोसले (६४*) आणि बिपिन चांगरे (५२) यांच्या खेळीमुळे संघाचा विजय सुकर झाला. बिपिन चांगरे याला सामनावीर घोषित करण्यात आले.


अमळनेरचा रावेरवर मोठा विजय
२० एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात अमळनेर सुहांस जायंट्सने प्रथम फलंदाजी करत २०१ धावांचा भव्य डोंगर उभारला. रणजीत निकम (५५), मानव टीब्रेवाला (५४) आणि ऋषी यादव (३७) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
प्रत्युत्तरात रावेर रॉयल्स १६४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. अमळनेरकडून मोहम्मद सैफने २ बळी घेतले. रणजीत निकम याला सामनावीर पुरस्कार मिळाला.


गुणतालिकेत जामनेर आणि जळगाव आघाडीवर

गुणतालिकेनुसार जामनेर सातपुडा हिरोज आणि जळगाव कोगटा किंग्स प्रत्येकी ६ गुणांसह अव्वल स्थानी आहेत. अमळनेर, चाळीसगाव आणि पाचोरा संघ २-२ गुणांसह पुढे आहेत, तर रावेर रॉयल्सला अद्याप विजय मिळालेला नाही.
आजचे सामने (२२ एप्रिल)
सकाळी ८.३०: रावेर रॉयल्स विरुद्ध पाचोरा एसकेटी योद्धाज
दुपारी ३.००: अमळनेर सुहांस जायंट्स विरुद्ध चाळीसगाव एसपीसीसी चॅलेंजर्स
सायंकाळी ७.३०: जळगाव कोगटा किंग्स विरुद्ध जामनेर सातपुडा हिरोज
स्पर्धेतील पुढील सामने अधिक रोमांचक होण्याची चिन्हे असून, उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक संघाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---