निविदेची माहिती न दिल्याने संताप; महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यावर हल्ला

---Advertisement---

 

जळगाव (प्रतिनिधी):
निविदेसंबंधित गोपनीय माहिती देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या व्यक्तीने महावितरणच्या सहाय्यक अभियंत्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना शहरातील दिक्षितवाडी परिसरातील महावितरण कार्यालयात घडली. ही घटना २० एप्रिल रोजी दुपारी घडली असून प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली (ता. जळगाव) येथील रहिवासी संजय रामभाऊ वराडे हे दुपारी सुमारे १२ वाजता कार्यालयात आले होते. त्यांनी सहाय्यक अभियंता संदीपकुमार रणछोड बडगुजर यांच्याकडे एका निविदेची माहिती मागितली. मात्र संबंधित निविदा गोपनीय असल्याने माहिती देता येणार नसल्याचे बडगुजर यांनी स्पष्ट सांगितले.


या उत्तरामुळे संतापलेल्या वराडे यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद पुढे धक्काबुक्कीपर्यंत वाढला. त्यांनी अभियंत्याची कॉलर पकडून शिवीगाळ केली तसेच केबिनमधील कागदपत्रे फेकून दिली. त्यानंतर बडगुजर यांना चापटा व बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर सहाय्यक अभियंता बडगुजर यांनी जिल्हापेठ पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून संजय रामभाऊ वराडे यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण करणे व मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय भांडारकर करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---