खोटारड्यांची आता खैर नाही, नारीशक्तीचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवणार : मुख्यमंत्री फडणवीस

---Advertisement---

 

मुंबई : महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून नारीशक्तीचा आणि लोकशाहीचा अपमान करणाऱ्या सीरियल लायर्स विरोधकांची आता खैर नाही, अशा आक्रमक शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर घणाघाती हल्ला चढवला आहे. जोपर्यंत देशाच्या संसदेत आणि विधानसभेमध्ये ३३ टक्के महिला पोहोचणार नाहीत, तोपर्यंत या खोटारड्या विरोधकांना आम्ही शांतपणे झोपू देणार नाही, असा सज्जड दमही त्यांनी दिला आहे.

मुंबईत युवाशक्ती जागर यात्रेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. कृष्णराज महाडिक यांच्या नेतृत्वात सुरू झालेल्या या युवाशक्ती जागर यात्रेच्या मंचावरून फडणवीसांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. संसदेत महिला आरक्षण बिलाची भ्र णहत्या याच विरोधी पक्षाने केली असल्याची टीका त्यांनी केली.

हे विरोधक म्हणजे सीरियल लायर्स (सराईत खोटारडे) असून ते दिवसातून पाच वेळा खोटं बोलतात, असा हल्लाबोल त्यांनी केला. २०२३ मध्ये जेव्हा हे विधेयक आले तेव्हा एनडीएकडे दोन तृतीयांश बहुमत असल्यामुळे त्यांनी नाईलाजाने तोंड दाबून समर्थन केले होते.

मात्र, आता बहुमताचे गणित बदलल्याचे पाहताच त्यांनी आपले खरे दात दाखवले असून खऱ्या अर्थाने या बिलाला विरोध केला आहे. डीलिमिटेशन आणि जनगणनेबद्दलही हे विरोधक रोज धादांत खोटे बोलत आहेत. नारीशक्तीला जागृत करून विरोधकांना धडा शिकवा ! सभागृहाम ध्ये अमित शहा यांनी सर्व वस्तुस्थिती स्पष्ट करूनही या लोकांना महिलांना आरक्षण द्यायचेच नाही, असा थेट आरोप फडणवीसांनी केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---