क्रिकेट विश्वात मोठी खळबळ; आधी चॅट नंतर धमक्या… सेक्सटॉर्शनमध्ये महिला क्रिकेटपटूसह तिच्या भावाला अटक…!

---Advertisement---

 

क्रिकेट विश्वात खळबळ उडवणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. सेक्सटॉर्शन आणि खंडणी प्रकरणात जम्मू-काश्मीरमधील एका महिला क्रिकेटपटूसह तिच्या भावाला आणि एका साथीदाराला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महिला क्रिकेटपटू फरखांदा अझीझ खान (वय ३०) आणि तिचा भाऊ बाझिल अझीझ खान (वय २७) यांना नवी दिल्लीतील एका हॉटेलमधून अटक करण्यात आली. तर त्यांचा साथीदार उद्दीन इम्तियाज वानी (वय २२) याला श्रीनगर येथून ताब्यात घेण्यात आले. फरखांदा खान ही जम्मू-काश्मीरमधील राष्ट्रीय स्तरावरील महिला क्रिकेटपटू असून ती टी-२० स्पर्धांमध्येही सहभागी झाली असल्याची माहिती समोर आली आहे.

सेक्सटॉर्शन व खंडणी प्रकरणातील तक्रारदार २८ वर्षीय तरुण असून तो मुंबईतील कुलाबा परिसरात राहतो. २०२४ मध्ये त्याची फरखांदा खानशी ओळख झाली होती. मोबाईल चॅट्समधून ओळख वाढत गेल्यानंतर आरोपींनी त्याला जाळ्यात ओढल्याचा आरोप आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, महिला क्रिकेटपटू फरखांदाने आर्थिक अडचणीचे कारण देत पैशांची मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी तक्रारदाराला त्याचे खाजगी चॅट्स सार्वजनिक करण्याची धमकी दिली. या दबावाखाली तक्रारदाराने एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२६ दरम्यान ३२ व्यवहारांद्वारे सुमारे २३.६१ लाख रुपये ट्रान्सफर केले.

याशिवाय, पुढे पुन्हा धमकी देत जानेवारी २०२६ मध्ये अतिरिक्त ४० लाख रुपये उकळल्याचाही आरोप आहे. तपासात या रकमेपैकी काही भाग साथीदारांच्या खात्यात वळवण्यात आल्याचे उघड झाले आहे.

ब्लॅकमेलिंग सुरूच राहिल्याने अखेर पीडिताने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर मुंबई गुन्हे शाखेने कारवाई करत तिघांना अटक केली असून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या घटनेमुळे क्रिकेट वर्तुळात खळबळ माजली असून, सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---