गुरुपुष्यामृत मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या आजचे भाव काय ?

---Advertisement---

 

जळगाव सुवर्णनगरीत गुरुपुष्यामृत मुहूर्ताच्या पार्श्वभूमीवर सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या शुभ मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण झाली आहे.

सराफ बाजारातून मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याच्या भावात तब्बल १ हजार २०० रुपयांची घसरण झाली असून सोनं सध्या १ लाख ५१ हजार रुपयांवर पोहोचले आहे. जीएसटीसह हा दर सुमारे १ लाख ५५ हजार ५३० रुपयांपर्यंत जात आहे. तर चांदीच्या दरात तब्बल ५ हजार रुपयांची घट झाली असून चांदीचा भाव २ लाख ४८ हजार रुपये आहे. जीएसटीसह हा दर सुमारे २ लाख ५५ हजार ४४० रुपये इतका आहे.

जागतिक घडामोडींचा थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होत असल्याने या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, गुरुपुष्यामृतसारख्या शुभ मुहूर्तावर दर कमी झाल्याने खरेदीसाठी हा योग्य काळ मानला जात आहे.

का खास आहे गुरुपुष्यामृत मुहूर्त? जाणून घ्या सविस्तर…

हिंदू धर्मात गुरुपुष्यामृत मुहूर्त अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी कोणतीही नवीन खरेदी, गुंतवणूक किंवा शुभकार्य सुरू केल्यास त्याचे दीर्घकालीन सकारात्मक परिणाम मिळतात, अशी श्रद्धा आहे. विशेषतः सोनं खरेदी केल्यास ते संपत्ती, समृद्धी आणि स्थैर्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे अनेक जण या दिवशी सोनं-चांदी खरेदी करण्यास प्राधान्य देतात. एकंदरीत सोन्या-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे यंदाचा गुरुपुष्यामृत मुहूर्त ग्राहकांसाठी अधिक फायदेशीर ठरणार असल्याची चर्चा बाजारात रंगू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---