कुंभमेळ्यासाठी ‘शून्य सहनशीलता’ धोरण; रेल्वे महाव्यवस्थापकांकडून विकास कामांचा आढावा

---Advertisement---

 

भुसावळ— आगामी कुंभ मेळा लक्षात घेऊन नाशिक शहरात तयारीला वेग आला असून, रेल्वे विभागाकडूनही युद्धपातळीवर कामे सुरू आहेत. भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सेंट्रल रेल्वे कडून विशेष नियोजन करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी भुसावळ विभागाचे रेल्वे व्यवस्थापक पूनीत अग्रवाल यांच्यासह विविध विकास कामांचा आढावा घेतला.
महाव्यवस्थापकांनी देवळाली, नाशिक रोड, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या प्रमुख स्थानकांसह एकलहरा सायडिंग येथे भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी प्रवासी सुविधा, सुरक्षा व्यवस्था, गर्दी नियंत्रण उपाययोजना आणि पायाभूत सुविधा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.


‘शून्य सहनशीलता’वर भर
कुंभमेळ्यादरम्यान अपेक्षित प्रचंड गर्दी लक्षात घेता, सर्व कामे वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच, “शून्य सहनशीलता” धोरण अवलंबून सुरक्षा आणि प्रवासी सुविधा सुनिश्चित करण्यावर विशेष भर देण्यात आला.
मोठ्या गर्दीसाठी विशेष तयारी
कुंभमेळ्याच्या काळात लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होण्याची शक्यता असल्याने, गर्दीचे सुयोग्य व्यवस्थापन, प्रवाशांची सुरक्षितता आणि रेल्वे सेवांची कार्यक्षमता यासाठी सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
या पार्श्वभूमीवर, रेल्वे प्रशासनाची ही पाहणी आणि नियोजन आगामी कुंभमेळा सुरळीत पार पाडण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---