वरणगावात वारंवार खंडित वीजपुरवठ्याने नागरिक संतप्त, तर लोंबकळणाऱ्या वीद्युत वाहीन्यांमूळे नागरीकांच्या जीवाला धोका

---Advertisement---

 

वरणगाव, (प्रतिनिधी) :  एकीकडे वाढत्या तापमानामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले असतानाच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिक घामाघूम झाले आहेत. त्यात जगदंबा नगरात विद्युत वाहिन्या जमिनी लगत लोंबकळत आहेत. यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला असतांना राममंदीर परीसरात आंबेडकर नगरला विद्युत पुरवठा करणाऱ्या रोहित्रामधुन कमी जास्त विद्युत पुरवठा होत असल्याने नागरीकांच्यां घरांमधील विजेवर चालणारे उपकरणे जळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात विजेच्या समस्या गंभीर बनल्या असुन ‘महावितरण’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन नागरीकांना सुरक्षिति व सुरळीत वीजपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विविध कारणांनी विजपुरवठा खंडीत

गेल्या काही दिवसांपासून सूर्य आग ओकत असल्याने उन्हाच्या दाहकतेमुळे शहरातील नागरिक हैराण झाले आहेत. त्यात कोणत्या न कोणत्या कारणांस्तव वारंवार वीजपुरवठा खंडित होत  असताना गेल्या दोन दिवसांपासुन महावितरणने ट्री कटींग सुरू केली आहे. त्याकरीता सकाळी ७.३०ते दुपारी ११.३० पर्यंत विजपुरवठा बंदचा मॅसेज टाकला जातो मात्र वेळ निघून गेल्यावरही विजपुरवठा सुरू होत नसल्या मूळे नागरीक चांगलेच संतापले आहे.

विजेमुळे विजेवरील पंखे, कूलर आदी उपकरणे बंद पडत असल्याने उन्हाच्या कडक्यापसून बचाव करण्यासाठी घरीच थांबलेले नागरिक घामाघूम होऊन हैराण होत.आहेत. शिवाय यंत्र बंद पडत असल्याने विजेवर अवलंबून असलेल्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम होऊन त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कार्यालयीन कामकाजही ठप्प होत असल्याने कार्यालयात कामासाठी ग्रामीण भागातून आलेल्या जनतेला प्रवास भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. यात वृद्ध महिला, विविध योजनांचे लाभार्थी यांचे हाल होत आहेत. लोंबकळत्या विद्युत वाहिन्या वरणगाव येथे विविध प्रभागात विद्युत वाहिन्या लोंबकळत असतांना जगदंबा नगरात हाताला लागण्याइतपत विद्युत वाहिन्या खाली लोंबकळत आल्याने धोका वाढला आहे.

अशा विद्युत वाहिन्यांची दुरुस्ती करणे गरजेचे असून त्याची माहिती विज वितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आली. परंतु, त्याची दखल घेण्यात आली नसल्याने धोका वाढला आहे. या विद्युत वाहिन्यांची उंची वाढवावी, अशी मागणी केली जात आहे. कमी जास्त विजपुरवठा उपकरणे जळण्याची भीती राममंदिर परिसरातील रोहीत्रांवरून डॉ. बाबासाहेब आंबेडकरात विद्युत पुरवठा जोडण्यात आला आहे. मात्र या रोहीत्रांवरून कमी जास्त विद्युत पुरवठा होत असल्यामूळे नागरीकांच्या घरांमधील विजेवर चालणारे उपकरणे जळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ऐन उन्हाळ्यात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांची रात्रीची झोप पळाली आहे.

या समस्येत आता आणखी भर पडली असून राममंदीर परीसरातील विद्युत रोहित्रा वरून  डॉ.बाबासाहेब आंबेडकर नारात कमी-अधिक विद्युतदाबाने वीजपुरवठा होत असल्याने नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. रात्री विद्युत प्रवाह कमी-अधिक दाबाने येत असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत गारवा मिळण्यासाठी घरातील टीव्ही, फ्रीज, एसी, कुलर, या उपकरणांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. या उपकरणांना वीजही अधिक लागते. मात्र अनेक दिवसांपासून रात्री अचानक कमी-अधिक दाबाने वीजपुरवठा होत असल्याने त्याचा परिणाम या महागड्या उपकरणांवर होत आहे, अशा तक्रारी सामाजिक कार्यकर्ता राजेश इंगळे यांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---