बारामतीत २०२९ ला जय विरुद्ध युगेंद्र लढत शक्य- रोहित पवार; युगेंद्र पवार काय म्हणाले जाणून घ्या!

---Advertisement---

 

बारामती: बारामतीच्या राजकारणात २०२९ च्या विधानसभा निवडणुकीची चर्चा आतापासूनच रंगू लागली असून, रोहित पवार यांनी “पवार विरुद्ध पवार” अशी लढत होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी संभाव्य लढत होऊ शकते, असे म्हटल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
मात्र, युगेंद्र पवार यांनी ही शक्यता फेटाळून लावत “पवार विरुद्ध पवार अशी लढत नको,” असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
दरम्यान, बारामतीत सुरू असलेल्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलताना रोहित पवार यांनी दिवंगत अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. बारामतीकर मोठ्या संख्येने मतदान करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विलीनीकरणाच्या चर्चेबाबत बोलताना ते म्हणाले की, “आज विलीनीकरणाचा प्रश्नच उरत नाही. दादा असताना जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्या असत्या, तर २०२९ मध्ये ते मुख्यमंत्री झाले असते.” तसेच त्यांनी स्पष्ट केले की, सध्याच्या घडीला विलीनीकरणाबाबत कोणतीही चर्चा सुरू नाही.


प्रचारात सहभागी होण्याबाबत ते म्हणाले की, हा निर्णय पूर्णतः भावनिक असून दिवंगत नेत्यांप्रती असलेल्या आदरापोटी आपण प्रचारात उतरलो आहोत. तसेच, २०१९ आणि २०२४ मध्ये कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढवल्यानंतर पुढेही तेथूनच राजकारण करणार असल्याचे सांगत त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवण्याच्या चर्चेला पूर्णविराम दिला.
एकूणच, २०२९ च्या संभाव्य “पवार विरुद्ध पवार” लढतीच्या चर्चेमुळे बारामतीच्या राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाल्याचे दिसत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---