कुसुंबे खुर्द येथे ‘राष्ट्रीय पोषण पखवाडा’ उत्साहात; माता-बालक मेळाव्याला मोठा प्रतिसाद

---Advertisement---

 

जळगाव: कुसुंबे खुर्द येथे अंगणवाडी व शासनाच्या वतीने राष्ट्रीय पोषण पखवाड्यानिमित्त माता-बालक पालक मेळाव्याचे आयोजन उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमत दैनिकाचे बारी सर यांच्या हस्ते रिबन कापून करण्यात आले.
यावेळी सरपंच मिनाबाई पाटील, प्रमोद घुगे, श्रावण कोळी, पल्लवी चौधरी, भारती पाटील, चंदू पाटील आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका अर्चना धामोरे यांनी केले.


मेळाव्यात गर्भवती महिलांना स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. स्वाती सुसे यांनी आरोग्य व पोषणाबाबत मार्गदर्शन केले. हा उपक्रम सुमारे १५ दिवस चालणार असून विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे.
कार्यक्रमात लहान मुलांसाठी मैदानी खेळ, अक्षर ओळख उपक्रम, सापशिडी, तसेच पाककला स्पर्धा, कडधान्यांपासून खाद्यपदार्थ तयार करणे, भाजीपाला स्टॉल आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, बचत गटाच्या महिला, आशा वर्कर आणि आरोग्य सेवक यांनी परिश्रम घेतले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---