भुसावळच्या राजकीय वर्तुळात खळबळ; नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध; नगराध्यक्षपदावर अपात्रतेची टांगती तलवार?

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निर्णय समोर आला आहे. भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री चेतन भंगाळे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

भुसावळ नगरपालिकेतील नगराध्यक्ष पद हे अनुसूचित जाती प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्या वतीने गायत्री भंगाळे यांनी विजय मिळवला होता. त्यांनी उमेदवारी अर्जासोबत अनुसूचित जाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र सादर केले होते.

दरम्यान, निवडणुकीनंतर आवश्यक असलेले जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेदरम्यान जळगाव येथील जात पडताळणी समितीने त्यांच्या प्रमाणपत्राची तपासणी केली. समितीच्या अध्यक्ष नयना बोदर्डे, सदस्य एन. एस. रावते आणि एस. एस. महाजन यांच्या समितीने हे प्रमाणपत्र अनुसूचित जाती प्रवर्गातील नसल्याचे नमूद करत ते अवैध ठरवले.

सदरची ही कारवाई प्रमोद सावकारे, रजनी सावकारे, संजय तायडे आणि राहुल तायडे यांनी केलेल्या तक्रारीनंतर करण्यात आली आहे. तसेच भुसावळच्या प्रांताधिकाऱ्यांवरही कारवाईचा प्रस्ताव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

या निर्णयामुळे गायत्री भंगाळे यांच्या नगराध्यक्षपदावर अपात्रतेची टांगती तलवार निर्माण झाली असून, पुढे काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---