पाचोऱ्यात रस्त्यावर दारू पिणाऱ्या २५ दारुड्याना पोलिसांनी घेतले ताब्यात, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

 

पाचोरा (प्रतिनिधी):- शहर सह परिसरात उघड्यावर दारू पिणारे व टवाळखोर यांच्या विरोधात पाचोरा पोलिसांनी शुक्रवारी मोहीम राबविण्यात आली या कारवाईत पोलिसांनी २५ दारुड्यांना ताब्यात घेत त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा नुसार कारवाई करण्यात आली.

दरम्यान दि. २४ रोजी पाचोऱ्यात गावठी दारू सह देशी विदेशीची सर्रास विक्री या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत पाचोऱ्यात पहिल्यांदाचं दारुड्यांविरोधात पाचोरा पोलिसांतर्फे मोहीम राबविण्यात आली. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे यांचे आदेशान्वये दिनांक २४ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते १० च्या दरम्यान पाचोरा शहरात व परिसरात उघडयावर दारु पिणारे व टवाळखोर यांच्या विरोधात पाचोरा पोलिसांनी कारवाई केली.

२५ जणांना ताब्यात घेऊन पाचोरा पोलीस स्टेशन येथे आणुन त्यांचेवर महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करण्यात आली.पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत ढिवरे, अपर पोलीस अधीक्षक चाळीसगांव परिमंडळ श्रीमती कविता नेरकर, उप विभागीय पोलीस अधिकारी बापु रोहम यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार व पोलीस अंमलदार, पाचोरा पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---