काटेवाडीत झाडाला बकरी टांगून अघोरी पूजा? रोहित पवारांच्या धक्कादायक दाव्याने खळबळ….!

---Advertisement---

 

राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवार यांनी केलेल्या धक्कादायक दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे. पुण्यातील सीआयडी कार्यालयात हजेरी लावल्यानंतर त्यांनी तपास यंत्रणांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत काही गंभीर आरोप केले.

रोहित पवार यांनी सांगितले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाला तीन महिने उलटूनही तपासात ठोस निष्कर्ष समोर आलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर त्यांनी तपासाचा वेगळा अँगल समोर आणला आहे.

आमदार रोहित पवार भोंदू बाबा अशोक खरात याच्या नावाचा उल्लेख करत, २७ ते २९ जानेवारीदरम्यान त्याच्या बँक खात्यात झालेल्या मोठ्या व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच बारामतीतील एका स्थानिक राजकीय नेत्याचा या प्रकरणाशी संबंध असू शकतो, असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

अमोल मिटकरी यांनी दावा केल्यानंतर पुन्हा सर्वाधिक खळबळजनक दावा करत त्यांनी म्हटले की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनापूर्वी काटेवाडी, बारामती आणि मुंबईतील देवगिरी बंगल्याबाहेर काही संशयास्पद पूजा करण्यात आल्या होत्या. काटेवाडीत एका झाडाला बकरीची पूजा करून टांगण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

“आम्ही अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नाही, मात्र या प्रकारांमागे कोणते षडयंत्र आहे का, याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे,” असेही ते म्हणाले. त्यांनी या प्रकरणातील कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) तपास यंत्रणांकडे असल्याचे सांगत, त्यातून पुढे मोठे खुलासे होऊ शकतात, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, तपास यंत्रणा या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---