धरणगावमध्ये भीषण अपघात; टायर फुटून क्रुझर गॅस टँकरवर आदळली, नववधूसह तिघांचा मृत्यू

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात वराड खुर्द परिसरात महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या क्रुझर वाहनाचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस टँकरवर जाऊन आदळले.

या धडकेत तिघांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये नुकत्याच विवाह झालेल्या एका नववधूचाही समावेश आहे. पूजा रवी वाघळकर, दत्तू भागवत आणि जगदीश वाघळकर अशी मृतांची ओळख पटली आहे. हे तिघेही एकाच कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.

अपघातात सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एका लहान मुलाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

गुजरातमध्ये लग्नसमारंभ आटोपून अकोल्याकडे परतणाऱ्या कुटुंबावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---