---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र जळगाव जात पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर पालिका प्रशासनाने त्यांचे शासकीय वाहन ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जात प्रमाणपत्राबाबत प्राप्त तक्रारींच्या आधारे चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर २३ एप्रिल रोजी समितीने प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे नगराध्यक्ष पदावरही संकट निर्माण झाले आहे.
दरम्यान, रविवारी रात्री उशिरा मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांच्या सूचनेनुसार अग्निशमन दल प्रमुख विवेक माकोडे यांच्या पथकाने संबंधित वाहन ताब्यात घेतले. विशेष म्हणजे सुट्टीचा दिवस आणि रात्रीची वेळ असतानाही अधिकृत पत्राशिवाय कारवाई झाल्याने वाद निर्माण झाला आहे.
या कारवाईवर प्रतिक्रिया देताना नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी “ही कारवाई पूर्णपणे नियमबाह्य आहे,” असे सांगत नाराजी व्यक्त केली आहे.









