---Advertisement---
सावकाराने कर्ज दिलं मात्र त्याच व्याज महिलेने दिलं नाही म्हणुन सावकाराकडून महिलेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून महाराष्ट्र या घटनेने पुन्हा हादरला आहे. तसेच सावकाराच्या मोबाईल मध्ये 200 ते 300 व्हिडिओ असल्याचा पीडित महिलेने दावा केल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक मधलं भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण ताजं असताना आणखी एक काळया कारनाम्याने महाराष्ट्र हादरला आहे. पीडित महिलेने सावकाराकडून कर्ज घेतलं होतं आणि व्याजाच्या पैशांच्या वसुलीसाठी सावकार आणि महिलेवर जबरदस्ती अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात घडली आहे. याप्रकरणी आरोपी सावकार अमित सावंत याच्यावर कोल्हापूर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यास अटक करण्यात आली आहे. आरोपी सावकार अमित सावंत यांच्या मोबाईलमध्ये अत्याचाराचे 200 ते 300 व्हिडिओ असल्याचा दावा पिडीत महिलेने केला आहे. यासह आरोपी सावकार हा फक्त एकाच महिलेवर हे कृत्य करत नव्हता तर यात असंख्य महिलांचा समावेश असल्याचाही दावा महिलेने केला आहे. त्यामुळे कोल्हापूरसह राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
आरोपी सावकार अमित सावंत हा कारचालक आहे. यासह तो खाजगी सावकारी देखील करतो. आणि याच प्रकरणातून कोल्हापूर नजीक असलेल्या गडमुडशिंगी या गावात राहणाऱ्या पिडीत महिलेने गरज असल्यामुळे त्याच्याकडे दोन ते तीन वर्षांपूर्वी 10 टक्के व्याजाने 2 लाख रुपये घेतलेले होते. काही कालावधी दरम्यान व्याज हे सुरळीत दिल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे पीडित महिलेला व्याज भरणे शक्य झालं नाही. मात्र याचा गैरफायदा आरोपी सावकार अमित सावंतने घेतला आणि पीडित महिलेच्या घरी गेला व त्या महिलेवर त्याने जबरदस्ती अत्याचार केला. आरोपी सावकार एवढ्यावरच न थांबता त्याने या संपूर्ण अत्याचाराचे व्हिडिओ शूट केले आणि हे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेवर वारंवार अत्याचार करत गेला.
कोल्हापूरचा आरोपी सावकार अमित सावंत याचा नीचपणा हा थांबत नव्हता. त्याने महिलांवरील अत्याचार केलेले सर्व व्हिडिओ हे त्याच्या मित्रांना देखील दाखवायला सुरुवात केली. पीडित महिलांना हे कळल्यानंतर संतप्त झालेल्या पीडित महिलेने त्याला जाब विचारला. मात्र अमित सावंतला याचा राग आल्याने त्याने पीडित महिलेसह तिच्या नातेवाईकांना, कुटुंबीयांना जबरदस्त मारहाण केली. अखेर या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने कोल्हापूरच्या गांधीनगर पोलीस ठाण्यात अमित सावंत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आणि या संपूर्ण घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून घेत अमित सावंत याला अटक केली.दरम्यान, अमित सावंतसह त्याचा मित्र रोहित कदम सावंत याच्या पत्नीवर पीडित महिलेने आणखी गंभीर आरोप केलेले आहेत.
एकंदरीत आर्थिक परिस्थितीच्या कचाट्यात अडकलेल्या पीडित असह्य झालेल्या महिलेवर अशा पद्धतीने अमित सावंत यांनी अत्याचार करून मोबाईल मध्ये 200 ते 300 व्हिडिओ घेतले. यात अजून कोणत्या महिलेचा समावेश असेल तर त्यांनी हिंमत करून तक्रारीसाठी पुढे यावं. असं आवाहन पीडित महिलेने केले असून आरोपी सावकार अमित सावंत याला फाशी देण्याची मागणी पीडितेने केलेली आहे.









