---Advertisement---
राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर यांची ईडी कडून तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली आहे. आणि या चौकशीनंतर यांचा मुलगा तन्मय चाकणकरला देखील चौकशीसाठी समन्स बजावला आहे.
नाशिकच्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत असून भोंदू बाबा अशोक खरातवर अनेक गंभीर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. यानंतर अशोक खरातचे सर्व आर्थिक व्यवहार तपासले गेले. दरम्यान रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यामध्ये तब्बल 230 वेळा कॉल वर बोलणं झाल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यानंतर ईडीने प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावलं होतं. त्यामुळे आता प्रतिभा चाकणकर यांनी चौकशीला सामोरे जात खळबळजनक दावा केला आहे.
नाशिकच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेत संशयास्पद व्यवहार आणि बोगस बँक खात्यांच्या प्रकरणात ईडीने प्रतिभा चाकणकर यांची सुमारे आठ तास चौकशी केली असून या चौकशीत त्यांनी खळबळजनक दावे केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ईडीच्या चौकशी दरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी असा दावा केला आहे की त्यांनी स्वतः आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर याच आधार कार्ड व पॅन कार्ड अशोक खरातकडे दिलेलं होतं. तर हे केवळ धार्मिक कामासाठी वापरले जातील असं आश्वासन अशोक खरात याच्याकडून प्रतिभा चाकणकर यांना देण्यात आलं होतं. मात्र अशोक खरातने त्या विश्वासाचा गैरवापर करून कागदपत्रांच्या आधारे नाशिकच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेत बेकायदेशीर रित्या बोगस बँक खात उघडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या प्रकरणात ईडीच्या हाती अनेक महत्त्वाचे धागेदोरे लागलेले आहेत. 2025 ते 26 दरम्यान प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्या तब्बल 230 कॉल्स आणि 200 पेक्षा अधिक जास्त मेसेज मधून बातचीत झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. या मोठ्या प्रमाणावरील संवादाची ईडी कडून सखोल चौकशी ही सुरू आहे. त्यामुळे या संशयास्पद बँक खात्यामध्ये खरात याचं नाव हे नॉमिनी म्हणून नोंदवण्यात आलं होतं. आणि खातं उघडताना अशोक खरातने त्याचा मोबाईल नंबर वापरल्याचा प्राथमिक संशय हा बळावला आहे.
दरम्यान आर्थिक व्यवहारांबाबत ईडीला देखील मोठा संशय आहे. 2021 मध्ये जमा झालेले 26 लाख रुपये एका विशिष्ट खात्यातून वळवून 2024 पर्यंत ते ठेवण्यात आले. सुमारे 40 लाख रुपयांचा परतावा मिळाल्याचं तपासात नमूद आहे. परंतु या आर्थिक व्यवहारात नफ्याचं नेमकं स्त्रोत काय होतं याचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. नाशिकच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांच्या नावावर आढळलेली चार खाती ही एकूण 134 संशयित बोगस खात्यांचा भाग असल्याचा संशय आहे.
प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी झाल्यानंतर याप्रकरणी ईडीने आता त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यालाही चौकशीसाठी समन्स बजावला आहे. आठ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर प्रतिभा चाकणकरांची सुटका जरी झाली असली तरी तपासातील विसंगती आणि नव्याने येणारी माहिती पाहता पुन्हा त्यांना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. त्यामुळे आगामी काळात तपास हा जसजसा पुढे जाईल, तसतसे आणखी नवीन कोणते मोठे फुलाचे होतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.









