मू. जे. महाविद्यालयातील ‘पदार्थविज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स विभागाद्वारे’ ऑनलाईन पद्धतीने माजी विद्यार्थी सभा…!

---Advertisement---

 

डिजिटल माध्यमांच्या साहाय्याने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात देश-विदेशात कार्यरत असलेल्या व जगभरात विख्यात माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि विद्यार्थ्यांना संबोधित केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. स. ना. भारंबे यांच्या अश्या पद्धतीने सभा आयोजित करण्यासाठी विशेष प्रोत्साहन व शुभेच्छा लाभल्या.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागतपर भाषणाने करण्यात आली. डॉ. प्रतिभा निकम, विभाग प्रमुख, पदार्थविज्ञान यांनी सर्व माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करताना माजी विद्यार्थ्यांचे सहकार्य हे विभागाच्या आणि महाविद्यालयाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे हे मांडून कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली. त्यानंतर, डॉ. कविता पाटील, विभाग प्रमुख, इलेक्ट्रॉनिक्स यांनी विभाग आणि महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाला लाभलेले सर्व नामांकित आणि आप-आपल्या क्षेत्रात नावाजलेले तसेच कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले.

श्री. संजय देशपांडे, Synechron Technologies Singapore Pte Ltd या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सध्याच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडीबाबत मार्गदर्शन करताना मेहनत, सातत्य आणि कौशल्यविकासाचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शन केले. श्री. देशपांडे यांनी यशाची गुरुकिल्ली नेमकी कोणती? हे सांगताना स्वयं अध्ययन आणि स्व-प्रोत्साहित असणे ह्याची गरज काय? तसेच, कोणत्याहो गोष्टीचा न्यूनगंड न बाळगता स्वयंशिस्त पाळणे यावर भर दिला.

तदनंतर, डॉ. पंकज कोईनकर, प्राध्यापक, तोकुशिमा विद्यापीठातील तंत्रज्ञान, औद्योगिक आणि सामाजिक विज्ञान पदव्युत्तर स्कुल, जापान यांनी त्यांचा महाविद्यालय ते जापान हा प्रवासक्रम विद्यार्थ्यांसमोर मांडून मार्गदर्शन केले. डॉ. कोईनकर यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी सात-सूत्री धोरण सांगताना त्याचे महत्व पटवून दिले. तसेच, जगभरातील आणि विशेषतः विद्यार्थ्यांसाठी जपानमध्ये उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या अनेक संधी सांगत त्या कश्या मिळविता येतील हे सांगितले.

NASA मध्ये अएरोस्पेस इंजिनीअर म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिमा पाटील या कामात व्यस्त असल्या कारणाने वेळेअभावी उपस्थित राहू शकल्या नाहीत, पण त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात प्रत्यक्ष भेट देण्याचा विचार व्यक्त केला. तसेच, त्यांनी विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा संदेश पाठविला आहे तो असा कि, मोठी स्वप्न बघा, आणि ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करायला मागे सरू नका. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवा, अडथळे आल्यास हार ना मानता पुढे वाटचाल करत रहाल तर यश नक्की मिळेल. त्यांनी त्याचा स्वतःच इथपर्यंतचा मार्गक्रम करत असताना,”फोकस, डेडिकेशन, पेशंस, पर्सिस्टंन्स, पर्सीव्हरन्स अँड नेव्हर गिव्ह-अप एटीट्युड’ या मुळे त्या आज जागतिक उच्च स्तरावर पोहचल्या असे त्यांनी स्पष्ट केले. आणि तुम्ही देखील असेच या सर्व सवयीना अंगीकाराल तर लक्ष्य प्राप्ती कराल असे सांगितले.

कार्यक्रमात प्रा. डॉ. किशोर महाजन, माजी विद्यार्थी, विभागाचे माजी विभागप्रमुख आणि वर्तमानकालीन प्राचार्य, के.सी. ई. सोसायटीचे पी. जी. कॉलेज, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांचा विभागातील जवळपास पंधरा वर्षाचा विभागप्रमुख म्हणून चा अनुभव, दरम्यान झालेले बदल विभागाची प्रगती आणि आज काळाची गरज यात परस्पर संबंध सांगताना सविस्तर अशी माहिती माजी आणि सद्य विद्यार्थ्यां समोर मांडली. त्यानंतर, प्रा. डॉ. आर. बी. वाघुळदे, प्राचार्य, धनाजी नाना चौधरी महाविद्यालय, फैजपूर संवाद साधत असताना त्यांनी आजच्या विद्यार्थ्यांची मानसिकता व त्यामुळे होणारे नुकसान यांचा पस्स्पर संबंध सांगत विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचा शॉर्टकट न वापरता स्वतःला ज्ञानार्जन कसे होईल ह्यावर भर द्यावा असे आव्हाहन केले. जास्तीत-जास्त पुस्तके वाचणे, त्यांचे आकलन करणे गरजेचे असून रोज नियमित आपली वर्ग उपस्थिती याचे महत्व आणि फायदे सांगितले. तसेच, प्रा. डॉ. आर. एस. खडायते, प्राचार्य, मनोहर धारिवाल कॉलेज, जामनेर यांनी यापुढे देखील अश्याप्रकारच्या सभा ह्या प्रत्येक्ष रूपाने घ्याव्यात जेणेकरून याचा आणखीन चांगला फायदा वर्तमानकालीन विद्यार्थ्याना आणि विभागाला होईल. त्यांनी विशेष भर देत उपस्थित मान्यवरांच्या ज्ञानाचा जास्तीत-जास्त फायदा विद्यार्थ्यांना कसा होईल? हे स्पष्ट केले. इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे माजी विद्यार्थी डॉ. किरण नेवे, मायक्रोनिक्स इन्स्ट्रुमेंट चे संस्थापक यांनी येत्या काळात बायोमेडिकल, बायोफिज़िक्स आणि बायोइलेकट्रोनिक्स यांचे वाढते महत्व सांगत विद्यार्थ्यांनी व्यवसाय दृष्टिकोन ठेवून याकडे वळावे असे आव्हाहन केले.

या बैठकीत सहभागीनी एकमेकांशी संवाद साधून जुन्या आठवणींना उजाळा दिला. काही माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयासाठी शिष्यवृत्ती, प्रशिक्षण कार्यक्रम आणि प्लेसमेंटसाठी मदत करण्याची तयारी दर्शवली. कार्यक्रमादरम्यान आठवणींना उजाळा देण्यात आला. काही विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनातील खास क्षण शेअर केले, ज्यामुळे वातावरण आनंददायी झाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली शर्मा यांनी व आभार प्रदर्शन डॉ. प्रेमजीत जाधव यांनी केले. तसेच, लागणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी व सोयी यांची विशेष जबाबदारी प्रा. भावना मानेकर आणि त्यांना मदत म्हणून डॉ. विशाल भारूड यांनी सांभाळली. आयोजकांनी सर्व सहभागींचे मनःपूर्वक आभार मानत भविष्यात अशा कार्यक्रमांचे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष शक्य ते नियमित आयोजन करण्याचा संकल्प व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---