पुणे पुन्हा हादरलं! ७० वर्षांच्या आजोबांकडून 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण…!

---Advertisement---

 

नसरापूर अत्याचाराची घटना ताजी असताना पुणे शहरात पुन्हा एक संतापजनक घटना घडली आहे. पुण्याच्या पर्वती परिसरामध्ये आजोबा कडून नववर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेची कुणकुण लागताच स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. आणि पोलिसांनी संशयित आजोबाला (आरोपीला) ताब्यात घेतला आहे.

पुण्याच्या पर्वती परिसरात एका भागात ही घटना घडली असून आरोपी आजोबांनी नववर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न केला आहे. परिसरातील नागरिकांना हा प्रकार लक्षात आला त्यांना संशय निर्माण झाला म्हणून तातडीने त्यांनी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला आणि मुलीची सुखरूप सुटका केली.

या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे पकडण्यात आलेला संशयित आरोपी हा पुढील मुलीचा सख्खा आजोबा असल्याचं समोर आलं आहे. सख्ख्या आजोबाने नाती सोबत असं प्रत्येक केल्याने परिसरात तीव्र संताप पसरला असून परिसरात नागरिकांनी मोठी खरेदी केली व काही काळ या ठिकाणी प्रचंड तणावाचं वातावरण तयार झालं होतं. संतप्त नागरिकांनी यावेळी आरोपी आजोबावर कठोर कारवाई करावी अशी मागणी पोलिसांकडे केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---