---Advertisement---
माळशेज घाटात महामार्गावर वैशाखरे वळणाजवळ भीषण अपघात झाला असून यात पाच जण हे गंभीर जखमी झालेले आहेत तर तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एसटी बस आणि स्कार्पिओची समोरासमोर जोरदार धडक होऊन हा भीषण अपघात घडला आहे.
कल्याण अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाटात वैशाखरे वळणाजवळ एसटी बसचा आणि स्कॉर्पिओ चा ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात भीषण अपघात झाला. कल्याण होऊन अहिल्यानगर कडे जाणारी एसटी बस व विरुद्ध दिशेने येणारी स्कॉर्पिओ यांच्यात ओव्हरटेक करताना जोरदार धडक झाली. या धडकेत दोन्हीही वाहनांचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघातानंतर स्थानिकांनी तात्काळ मदत कार्य करत जखमींना वाहनातून बाहेर काढलं आणि रुग्णालयात उपचारार्थ हलवलं. घटनेची माहिती मिळताच टोकावडे महामार्ग पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली व अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झालेली त्यामुळे दोन्हीही अपघातग्रस्त वाहन हे बाजूला करत वाहतूक सुरळीत सुरू केली.
याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलं असून पुढील तपासा पोलिसांकडून सुरू आहे.









