श्री खाटू श्याम व अजमेर जाण्यासाठी काकीनाडा टाऊन-हिसार एक्सप्रेस कायमस्वरूपी धावणार; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा…!

---Advertisement---

 

राजस्थान राज्यातील प्रसिद्ध श्री खाटू श्याम मंदिर आणि अजमेर शरीफ दर्गा येथे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी आता मोठी दिलासादायक बातमी आहे. रेल्वे प्रशासनाने काकीनाडा टाऊन-हिसार विशेष एक्स्प्रेसला नियमित सेवा देण्याचा निर्णय घेतला असून, त्यामुळे खान्देशातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे.

यापूर्वी या ठिकाणी जाण्यासाठी भुसावळ, जळगाव, धरणगाव आणि अमळनेर येथील प्रवाशांना खाजगी बसने महागडा प्रवास करावा लागायचा किंवा अनेक गाड्या बदलाव्या लागत होत्या. मात्र आता थेट रेल्वे सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवासाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

सद्यस्थितीत धावणारी 07717/07718 काकीनाडा टाऊन-हिसार ही विशेष साप्ताहिक ट्रेन आता नियमित एक्स्प्रेसमध्ये रूपांतरित करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 17295 काकीनाडा टाऊन-हिसार साप्ताहिक एक्स्प्रेस येत्या 12 मेपासून सुरू होणार असून, गाडी क्रमांक 17296 हिसार-काकीनाडा टाऊन एक्स्प्रेस 15 मेपासून धावणार आहे.

17295 ही गाडी दर मंगळवारी काकीनाडा टाऊन येथून सकाळी 05:40 वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी हिसार येथे सकाळी 10:20 वाजता पोहोचेल. तर 17296 ही गाडी दर शुक्रवारी हिसार येथून दुपारी 02:10 वाजता सुटून तिसऱ्या दिवशी काकीनाडा टाऊन येथे रात्री 09:35 वाजता पोहोचेल.

या गाडीला अप व डाऊन मार्गावरील भुसावळ, जळगावसह धरणगाव आणि अमळनेर या स्थानकांवरही अधिकृत थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---