---Advertisement---
लोहारा ते फैजपूर दरम्यान येणाऱ्या पाणीपुरवठा पाइपलाइनमधील गळती दुरुस्तीच्या महत्त्वाच्या कामांना दिनांक १२ मे पासून प्रारंभ करण्यात आला आहे. या पाइपलाइनमध्ये सुमारे २० ते २५ ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती आढळून आली होती. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम होत होता. नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी या सर्व गळतींची जोडणी व दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेण्यात आली आहेत.
तसेच या पाइपलाइन मार्गावर एकूण ३५ एअरवाल असून त्यापैकी १५ नवीन एअरवाल बसविण्यात येणार आहेत, तर उर्वरित २० एअरवालची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या सर्व कामांमुळे पाणीगळती कमी होऊन पाण्याचा अपव्यय थांबणार असून शहरातील नागरिकांना नियमित आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा होण्यास मदत होणार आहे.मात्र काही जागी माती मिश्रित पाणी पुरवठा होवू शकतो नागरिकांनी दखल घ्यावी
फैजपूर नगराध्यक्षा दामिनी पवन सराफ यांनी निवडणुकीच्या काळात नागरिकांना शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता करण्याचा यशस्वी कार्य जोमाने सुरू आहे असे नगरप्रशासन कडून माहिती दिली आहे









