---Advertisement---
रोम : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इटली दौऱ्यातील एक खास क्षण सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना मोदींनी भारतातील लोकप्रिय ‘Melody’ चॉकलेटची भेट दिल्याचा व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या पाच देशांच्या दौऱ्यावर असून त्याच्या अंतिम टप्प्यात ते इटलीत दाखल झाले होते. रोममध्ये झालेल्या भेटीदरम्यान मोदी आणि मेलोनी यांनी एकत्र फोटोही काढले. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आले आहेत.
भारताचे पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना ‘Parle Melody’ चॉकलेटचे पाकिट भेट दिले. मेलोनी यांनी स्वतः त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर करत “Thank you for the gift” असे कॅप्शन दिले. त्यानंतर हा व्हिडिओ काही मिनिटांतच व्हायरल झाला.
गेल्या काही महिन्यांपासून नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या नावावरून सोशल मीडियावर ‘Melodi’ हा ट्रेंड सुरू झाला होता. दोघांचे फोटो, सेल्फी आणि सार्वजनिक कार्यक्रमातील संवाद नेटकऱ्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत होते. याच ट्रेंडला हलक्याफुलक्या अंदाजात प्रतिसाद देत मोदींनी ‘Melody’ चॉकलेटची भेट दिल्याची चर्चा आता रंगली आहे.
रोममध्ये पोहोचल्यानंतर मेलोनी यांनी मोदींसोबत सेल्फी घेत “Welcome to Rome, my friend!” असे म्हणत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. या पोस्टलाही मोठा प्रतिसाद मिळाला. मोदी आणि मेलोनी यांच्या या खास भेटीमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा ‘Melodi’ ट्रेंड जोरात सुरू झाला आहे.









