यावल येथे ढाब्यावर व्यवस्थापक तरुणाने केली गळफास घेत आत्महत्या; यावल पोलीसात मृत्यूची नोंद…!

---Advertisement---

 

यावल शहरातील फैजपूर रोड वरील महेंद्र ढाबाचे व्यवस्थापक भरत ज्ञानेश्वर वानखेडे (वय २७) या तरूणाने हॉटेल मध्येच एकटा असल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनासमोर आली असून यावल पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे .

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहीती अशी की, यावल शहरातील फैजपुर मार्गावरील असलेल्या महेन्द्र ढाबा या ठीकाणी ढाब्याचा व्यवस्थापक भरत ज्ञानेश्वर वानखेडे वय २७ वर्ष राहणार यावल या तरूणाने रात्रीच्या सुमारास आपल्या ढाब्यावरच एकटा असतांना गळफास घेत आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. या तरूणाने टोकाचे पाऊल उचलल्यामुळे तरुण वर्गामध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत महेन्द्र रामा जावरे यांनी खबर दिल्याने यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भरत वानखेडे या तरूणाचे मागील वर्षीच लग्न झालेले होते. त्याच्या पश्चात कुटूंबात आई वडील, पत्नी, दोन भाऊ असा परिवार आहे. त्याच्या मृत्यूमुळे शहरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. सदर तरुणाने आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---