माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या मेहुण्याला अटक; ५.३३ कोटींच्या देवगिरी बँक घोटाळ्याप्रकरणी मोठी कारवाई, न्यायालयाकडून चार दिवसांची पोलीस कोठडी….!

---Advertisement---

 

देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या चाळीसगाव शाखेतील तब्बल ५ कोटी ३३ लाख रुपयांच्या कथित फसवणूक प्रकरणात फरार असलेल्या माजी खासदार उन्मेष पाटील यांचे मेहुणे प्रशांत वाघ याला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे या कारवाईमुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावावर घेतलेले औद्योगिक कर्ज थकीत झाल्यानंतर बँकेत गहाण ठेवलेली मशिनरी संगनमताने विकल्याचा आरोप संबंधितांवर आहे. या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी तपास सुरू केला होता.

याबाबत चाळीसगाव शहर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रशांत वाघ याला सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याला आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे.

न्यायालयासमोर हजर केल्यानंतर प्रशांत वाघ याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष बाब म्हणजे, प्रशांत वाघ हे माजी खासदार उन्मेष पाटील यांचे निकटवर्तीय असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, या घटनेमुळे चाळीसगावसह संपूर्ण जळगाव जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---