---Advertisement---
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात गेली चार महिने योजनेचा हप्ता जमा झालेले नाही. अशा लाडक्या बहिणींसाठी लाभदायक माहिती समोर येत आहे.
फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे गेली चार महिने हप्ते न मिळालेल्या पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना थकीत रक्कम एकत्रितपणे दिली जाऊ शकते. प्रत्यकी दर महिन्याला 1500 रुपये या प्रमाणे चार महिन्यांचे एकूण रक्कम 6000 रुपये होते. ही रक्कम दोन टप्प्यांत जमा होण्याची शक्यता दर्शवली जात आहे. पहिल्या टप्प्यात फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचे 3000 रुपये, तर दुसऱ्या टप्प्यात एप्रिल आणि मे महिन्यांचे 3000 रुपये लाभार्थीं लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा केले जाऊ शकतात.
मात्र, या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारकडून किंवा संबंधित विभागाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे 6000 रुपये कधी आणि कशा प्रकारे जमा होणार याबाबत स्पष्ट माहिती येणे बाकी आहे. लाभार्थी लाडक्या बहिणींनी आपल्या अर्जाची सद्यस्थिती, ई-केवायसी आणि बँक खात्याची माहिती योग्य असल्याची खात्री करून घ्यावी. राज्य सरकारकडून अधिकृत सूचना जाहीर झाल्यानंतरच अंतिम माहिती स्पष्ट होईल.









