‘या’ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींवर मोठी कारवाई , 33 हजार महिला कायमच्या अपात्र, प्रशासन करणार वसुली…!

---Advertisement---

 

लाडक्या बहिणींना मोठा धक्का बसला आहे . महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील 33 हजार 304 लाभार्थी लाडक्या बहिणींनी अपात्र ठरवण्यात आले आहे. प्रशासनाच्या ई-केवायसी आणि अर्ज पडताळणी प्रक्रियेनंतर ही माहिती समोर आली आहे.

प्रशासनाच्या पडताळणी चुकीची माहिती, उत्पन्न निकषांचे उल्लंघन, आयकर भरणारे लाभार्थी, चारचाकी वाहनधारक तसेच इतर नियमबाह्य प्रकरणे आढळून आली. काही प्रकरणांमध्ये धक्कादायक बाब समोर आली आहे की काही ठिकाणी महिलांच्या नावाने पुरुषांनीही योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. अपात्र लाडक्या बहिणींनी घेतलेल्या अनुदानाची वसुली करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाद्वारे देण्यात आली आहे.

राज्यभरात पडताळणी प्रक्रियेनंतर मोठ्या प्रमाणावर अपात्र लालाडक्या बहिणींना वगळण्यात आले आहे. शासनाने निकष पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई सुरू ठेवली असून, योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळावा यासाठी तपासणी अधिक कठोर करण्यात आली आहे.


Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---