‘गिरीशभाऊ’ तुम्ही तर त्या बारामतीकरांचेही संकटमोचक आहात हो..!

---Advertisement---

 

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युवा नेते रोहीत पवार यांनी आंदोलन केले. मुळात ज्या कुटुंबाने सतत राजकारणच केले व राजकारण हाच व्यवसाय म्हणून स्विकारला त्यांचे हे आंदोलन महाराष्ट्राचे दैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरात होणे हेच चुकीचे… कारण पंढरपूर हे राजकारणाचे ठिकाण नाहीच… असो.. या उपोषणाविषयी चर्चा तसेच ते सोडविण्यासाठी खान्देशचे नेते … तथा संकटमोचक म्हणून ओळख असलेल्या गिरीश महाजन यांनी तेथे यावे हा हट्ट मोठ्या चर्चेचा विषय ठरला. पवारांनाही अखेर संकटमोचक गिरीशभाऊंचा आधार घ्यावा लागलाच. पण त्यांचा शेतकऱ्यांविषयीचा कळवळा हा ‘पुतणा मावशीचे प्रेमच’… म्हणावे लागेल.

या राज्यात अनेक वर्षे ज्यांच्या हातात सत्ता होती… त्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्षच केले. आज पवार कुटुंबियांच्या हातात सत्ता नसली तरी पश्चिम महाराष्ट्रात दादागिरी ही आहेच. ‘बारामती अॅग्रो’च्या माध्यमातून काही सहकारातील प्रकल्प या मंडळींच्या ताब्यात आहेत. अगदी आमच्या चोपडा तालुक्यातील साखर कारखानाही ‘बारामती अॅग्रो’ ने चालविण्यास घेतला आहे. या माध्यमातून का होईना कारखाना सुरू रहातोय याचे समाधान मात्र परिसरातील शेतकरी नाडला जातोय का?, त्याच्या ऊसाला योग्य भाव मिलतोय का?, त्याची पूर्वीची काही देणी होती ती या मंडळींना दिली का? यातून फारसे समाधान होत नाही. कारखान्यामुळे शेकडो हातांना काम मिळतेयं, पुरक छोट-छोटे उद्योग उभे रहातायं… याचे निश्चित समाधान आहे मात्र शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळणे हेदेखील तेवढेच महत्वाचे आहे.

बारामतीकरांचा इतिहास याप्रश्नी फारसा समाधानकारक नाहीच. तसे पाहीले तर राज्यातील शेतकरी हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्याच्या प्रश्नावर राजकारण नव्हे तर उपाययोजना अपेक्षित असतात. मात्र दुर्दैवाने शेतकऱ्यांच्या वेदना अनेकदा आंदोलन, निवेदने, घोषणबाजी आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप या पर्यंतच मर्यादीत रहातात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाने होणाऱ्या प्रत्येक आंदोलनामागील हेतू तपासण्याचा अधिकार हा जनतेला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आंदोन करताना रोहित पवार यांनी सरकारवर टीका केली. आणि जे काय प्रश्न आहेत ते मागणी केली. प्रश्न विचारण्याचा आणि आंदोलन करण्याचा अधिकार लोकशाहीत प्रत्येकाला आहे परंतु जनतेच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की रोहित पवार ज्या कुटुंबातील सदस्य आहेत त्या कुटुंबाने दशकानुदशके राज्याच्या राजकारणात प्रभाव गाजवला त्यांनी आपल्या सत्ताकाळात शेतकऱ्यांचे किती प्रश्न कायमस्वरूपी सोडविले? आजही ऊस उत्पादक, आमचा कापूस उत्पादक, कांदा उत्पादक आणि केळी उत्पादक तसेच फळबागाधारक शेतकरी हमीभाव, उत्पादन खर्च, बाजारपेठ आणि नैसर्गिक संकटांना तोड देत आहे. मग इतकी वर्षे सत्तेत राहीलेल्या नेतृत्वाला या प्रश्नावर ठोस उपायोजना का करता आल्या नाहीत ? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.

सहकाराचे वाटोळ केलेल्या काही मंडळीच्या धोरणांमुळे काही उद्योग बंद झाले. या उद्योगांच्या चिमणीतून बारामती अॅग्रोमुळे पुन्हा धुर बाहेर पडू लागला यात शंका नाही. पवारांची सत्ता होती त्या काळातील प्रश्नांना त्या काळात न्याय न मिळू शकल्याने अनेक विषय आता शेतकऱ्यांना सतावून आहेत. रोहित पवार हे आज आंदोलन करताय… त्यामागील राजकारण न समजण्याएवढी जनता खुळी नाही… परिणामी त्यांच्या कुटुंबाला धाव घेऊन आंदोलन स्थळी रडण्याची वेळ आलीच नसती. अखेर मध्यस्थी करणाऱ्या संकटमोचक गिरीशभाऊंचा धावा सुरू झाला. जळगाव, नाशिक विधान परिषदेच्या निडणुकीचा वाद सुरू असताना केवळ माणुसकी म्हणून राजकारण बाजुला ठेऊन गिरीश महाजन यांनी पंढरपुरला धाव घेतली व तोड सुकलेल्या स्थितीत बसलेल्या रोहित पवारांना त्यांनी सरबत देऊन… ठिक आहे सरकार तुमच्या मागण्याचा विचार करेल…. तुमचे म्हणजे देवेंद्रजींकडे सांगतो असे आश्वासन देऊन उपोषण सोडविले. उपोषण सोडविण्यास कोणी आले नाही तर फजिती होईल या संकटातील रोहित पवारांचा यामुळे जीव भांड्यात पडला… सुटलो रे भो… असे मनात म्हणत त्यांनी गटागटा ते सरबत पोटात टाकले. भविष्यात उपोषण करायचे की नाही? असाच प्रश्न त्यांच्या मनात यावेळी उभा राहीला असेलच असेल. खान्देशच्या नेत्यांची ताकद यामुळे त्यांना कळली असेच या निमित्ताने समोर आले आहे.

शेतकऱ्यांच्यासाठी नाटकी अश्रू ढाळणे सोपे पण त्यांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे कठीण असते. म्हणूनच आंदोलन करणाऱ्यांनी प्रथम आपल्या पुर्वजांच्या व आपली सत्ता असलेल्या संस्थांमधील परिस्थितीचा विचार करणे गरजेचे आहे असे वाटते. राजकारण करणे सोपे पण जनतेला अगदी ‘येडा-खुळा’ आता समजू नये… ते दिवस गेले… आपले सत्तागड केव्हाच ढासळले… याची किमान जाणीव ठेवणे गरजेचे आहे. आज जनतेला भाषणांपेक्षा परिणाम व घेतलेले निर्णय महत्वाचे वाटतात. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी आता केवळ घोषणांना भुलणारा राहीलेला नाही. कोण सोबत आहे आणि कोण केवळ राजकीय संधी शोधतोय याची जाणीव त्याला निश्चित आहे. फारसा विचार न करता व राजकीय जोडे बाहेर ठेऊन गिरीशभाऊंनी यावेळी माणुसकी दाखविली… कारण या मंडळींना एकही दिवस उपाशीपोटी रहाण्याची सवय नाही हे ते जाणून होते म्हणून आले भविष्यात अशी नौटंकी करू नका नाहीतर काय होईल हे सांगणे न बरे…..!

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---