---Advertisement---
जळगाव : विधानसभा निवडणूकीची धामधुम सुरू असून यात महायुतीचे उमेदवार आमदार राजूमामा भोळे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांच्या प्रचारात हजारोंच्या संख्येने नागरीक सहभागी होत आहेत. त्यांच्यावर विविध सामाजिक संघटनांनी विश्वास दाखवित पाठिंबा दर्शविला आहे. तर काही सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. याच प्रमाणे राजकीय पदाधिकारी देखील आ. भोळे यांच्यावर विश्वास ठेवून भाजपात दाखल होत आहेत. आज सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ. भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
आमदार राजूमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मनसेचे विभाग प्रमुख हर्षल माहाडीक यांच्यासह दर्शन पाटील, पंकज पाटील, मयुर पाटील, दुर्गेश पाटील, आदीनाथ जाधव, कल्पेश पवार, ज्ञानेश्वर भोई, अनुराग तरटे, मनोज कुमार, सागर पाटील, त्रिशुल कोळी, राहुल बढे, सचिन परदेशी, दीपक पाटील, विशाल सपकाळे, मुकेश कोळी, प्रितम सपकाळे, लकी कोळी, हर्षल इंगळे, गणेश सोनवणे, सुरज लोहार, पवन पाटील, राहुल पाटील, बादल साबळे आदी ८० कार्यकर्त्यांनी आमदार राजुमामा यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विठ्ठलभाऊ पाटील यांच्या प्रयत्नातुन हा प्रवेश सोहळा झाला. यावेळी जिल्हा महानगर अध्यक्ष उज्ज्वला बेंडाळे, नितीन पाटील, विक्रमभाई तरसोडीया, राजेंद्र घुगे, भारती सोनवणे, रेखा वर्मा, अशोक राठी, मनोज भंडारकर, अमित काळे, नीलु आबा तायडे आदी उपस्थित होते.