---Advertisement---

Crime News: जळगाव हादरले! खुनाच्या गुन्ह्यातील एकावर प्राणघातक हल्ला

by team
---Advertisement---

Jalgaon Crime News: गुन्ह्यांच्या घटनेने जळगाव पुन्हा हादरले आहे. या ठिकाणी खुनाच्या गुन्ह्यातील संशयितावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. जखमी हा गेल्या चार वर्षांपासून कारागृहात होता. त्याची शुक्रवारी जामिनावर सुटका झाली असता त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने खळबळ घडली आहे. जखमी हा जामीनानंतर घरी जात असताना तीन हल्लेखोरांनी त्याच्यावर धारदार तलवार आणि टॉमीने वार केले. डोक्यावर वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

ही थरार घटना शुक्रवार, 21 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शाहू नगरातील हॉटेल धैर्यमसमोर घडली. प्रतीक हरिदास निंबाळकर (वय 28, रा. जुना कानळदा रोड, सिटी कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. सन 2020 मध्ये शहरात एका तरुणाचा खून झाला होता. या खून प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात प्रतीक निंबाळकर हा चार वर्षांपासून कारागृहात होता. आज त्याच्या जामिनावर न्यायालयात कामकाज झाले. न्यायालयाच्या अटीशर्तीनुसार त्यास जामीन मंजूर झाला. कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रतीक हा त्याचा भाऊ वैभव निंबाळकर याच्यासोबत दुचाकीने न्यायालयातून घरी जात होता.

शाहू नगरातून दुचाकी जात असताना तीन हल्लेखोरांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढविला. धारदार तलवार आणि टॉमीने त्याच्या डोक्याच्या बाजूला वार केल्याने प्रतीक हा दुचाकीवरून रस्त्यावर कोसळला आणि रक्ताच्या थारोळ्यात पडला. हल्ल्यानंतर तिघे हल्लेखोर पसार झाले. जखमीला तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्यासह शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी यांनी रुग्णालयात धाव घेतली. तरुणावर उपचार सुरू असून डोक्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे वैद्यकीय सूत्रांकडून सांगण्यात आले. या घटनेने शहरात खळबळ उडाली. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment