---Advertisement---

Akshaya Tritiya 2025 : अक्षय्य तृतीयेला चुकूनही खरेदी करू नये ‘या’ वस्तू

---Advertisement---

Akshaya Tritiya 2025 : सनातन धर्मात अक्षय तृतीयेचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी अक्षय तृतीया (३० एप्रिल, बुधवार ) रोजी साजरी केली जात आहे. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी अक्षय तृतीया म्हणून साजरी केली जाते. हा सण भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांच्या विवाहाचे प्रतीक आहे. हा सण शुभ कार्यांच्या सुरुवातीसाठी देखील शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेचा अर्थ “असीम फळे देणारा” आहे. या दिवशी केलेली सर्व शुभ कामे अक्षय म्हणजे अनंत फळे देणारी असतात.

असे म्हटले जाते की जे लोक या तिथीला खऱ्या भक्ती भावाने धनदेवतेची पूजा करतात, त्यांचे धन आणि सौभाग्य वाढते. अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा काही वस्तू आहेत, ज्या खरेदी करणे टाळावे अन्यथा तुमचे सौभाग्य दुर्दैवात बदलू शकते. चला तर या बद्दल जाणून घेऊया…

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काय खरेदी करू नये?

अक्षय तृतीयेच्या दिवशी, ज्या वस्तूंचे नकारात्मक परिणाम होतात अशा वस्तू खरेदी करू नयेत जसे की चाकू, सुई, कात्री, या वस्तू खरेदी करू नयेत. या नकारात्मकतेचे सूचक आहेत. अशा परिस्थितीत व्यक्तीच्या जीवनात अडचणी येऊ लागतात.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी प्लास्टिकच्या वस्तू, स्टीलची ॲल्युमिनियमची भांडी, काळे कपडे, धारदार वस्तू, काळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करू नयेत, असे सांगितले जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने घरात दारिद्र्य येते. याशिवाय घरामध्ये ग्रह आणि वास्तु दोष राहतात. अशा वेळी या शुभ मुहूर्तावर चुकूनही या वस्तू खरेदी करू नका. अन्यथा तुम्हाला दुर्दैवाला सामोरे जावे लागू शकते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment