---Advertisement---

Jalgaon News : राज्यमंत्री रक्षा खडसे, मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्हा दौऱ्यावर

---Advertisement---

जळगाव : राज्यमंत्री रक्षा खडसे, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, पालकमंत्री गुलाबराव पाटील जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आज रात्री 8.40 वाजता, क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचे 18 रोजी सकाळी 7.15 वाजता, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचे 18 रोजी सकाळी 7.15 वाजता जिल्हयात आगमन होणार असून, नियोजित दौरा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा जळगाव जिल्ह्यातील नियोजित दौरा गुरुवार, दि. 17 रोजी रात्री 8.40 वाजता निझामुद्दीन एक्सप्रेसने जळगाव रेल्वे स्थानक येथे आगमन, रात्री 8.50 वाजता जळगाव येथून शासकिय वाहनाने पाळधी ता. धरणगांव जि. जळगांवकडे प्रयाण. रात्री 9.20 वाजता पाळधी ता. धरणगांव जि. जळगांव येथे आगमन व राखीव.

राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दौरा

जळगाव : केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचा दि. 18 ते 20 एप्रिल 2025 दरम्यान जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा शुक्रवार, दि. 18 रोजी सकाळी 7.15 वाजता भुसावळ रेल्वेस्टेशन येथे आगमन, सकाळी 7.30 वाजता भुसावळ रेल्वे स्टेशन वरुन मोटारीने मुक्ताईनगर येथे प्रस्थान 11.00 ते 4.00 वाजता निवासी शिबीर कार्यालयीन कामकाज कार्यकर्तासोबत मुक्ताईनगर येथे बैठक, रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.शनिवार दिनांक 19 एप्रिल, 2025 रोजी 10.00 ते 1.00 वाजता मुक्ताईनगर येथे निवासी कार्यालयीन कामकाज , 2.00 ते 4.00 वाजता राखीव , 4.00 ते 6.00 वाजता निवासी शिबीर कार्यालयात मुक्ताईनगर निवासस्थानी शासकीय काम आणि स्थानिक कार्यकर्त्यांसोबत बैठक. रात्री मुक्ताईनगर येथे मुक्काम.रविवार, दिनांक 20 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता मुक्ताईनगर येथून नादुरा बुलढाणा येथे पुढील कार्यक्रमा करीता रवाना, सायंकाळी 5.00 वाजता मुक्ताईनगरकडे रवाना व रात्री मुक्काम मुक्ताईनगर येथे.

ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा दौरा

जळगाव : ना. संजय सावकारे, मंत्री, वस्त्रोद्योग, महाराष्ट्र राज्य, यांचा जळगाव जिल्हा दौरा शुक्रवार, दि. 18 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 06. 45 वाजता महानगरी एक्सप्रेसने भुसावळ रेल्वे स्टेशन येथे आगमन व निवासस्थानाकडे प्रयाण, सकाळी 7.15 वाजता भुसावळ निवासस्थान येथे आगमन व राखीव.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment