---Advertisement---

खासदार अमोल कोल्हे, आदित्य ठाकरे अन् उद्धव ठाकरे; वाचा कुणाला काय म्हणाले ना. गुलाबराव पाटील?

---Advertisement---

जळगाव : ज्यांनी हिंदुत्व सोडलं, त्यांनी आता बाळासाहेबांचे भाषण दाखवून उपयोग नाही. बाळासाहेबांनी त्यावेळेस काय विचार मांडले होते. पक्ष कसा स्थापन केला होता आणि आता आपण काय करतोय? आता हे बाळासाहेबांचे भाषणं त्यांनीच पहावं, जेणेकरून त्यांना पक्ष सुधारणा करता येईल, असा सल्ला ना. गुलाबराव पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिला.

नाशिक येथे नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा शिबिर मेळावा झाला. या मेळाव्यात एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण दाखवण्यात आले होते. दरम्यान, यावर आज शुक्रवारी ना. गुलाबराव पाटील जळगावात माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरेंनी भाषणाच्या सुरुवातीचेच वाक्य गाडले!

त्यांनी आपली विचारधारा सोडली, आपल्या पक्षाचे वडिलांचे विचार सोडले, त्यांनी आता कुणाला मार्गदर्शन करण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे यांची भाषणाची सुरुवात माझ्या शिवसेनेच्या बांधवांनो व भगिनींनो इथून झाली. बाळासाहेबांच्या भाषणामध्ये हिंदू-माता भगिनींनो आणि मित्रांनो, अशी सुरुवात होत होती. भाषणाच्या सुरुवातीचेच वाक्य उद्धव ठाकरे यांनी गाडलेले आहेत, त्यांनी बाकीच्या गोष्टी बोलण्यात अर्थ नाही, असा टोला ना. गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

आदित्य ठाकरे फक्त प्रॉपर्टीचे वारसदार

शिवसेनाप्रमुख हे सर्वांचे दैवत आहेत. ते वारसदार फक्त प्रॉपर्टीचे आहेत, त्यांच्या विचारांचे नाही. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार असल्यामुळे जेवढं काम आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या काळात केलं नाही तेवढे आम्ही केलेल आहे. आदित्य ठाकरे यांनी आजोबांचा फोटो लावून स्वतःचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही बाळासाहेबांचं नाव उंचावलेला आहे आणि विचार पुढे नेत आहोत हा फरक आहे, असेही ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

खासदार अमोल कोल्हे यांना प्रत्युत्तर

लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. 2100 तर सोडा आता जे आहे ते देखील कमी करायला सुरुवात केली आहे, अशी टीका खासदार अमोल कोल्हे यांनी जळगाव दौऱ्यावर असताना केली. यावर प्रत्युत्तर देताना ना. गुलाबराव पाटील यांनी सांगितले की ”योजना करताना काही योजनेचा लाभ घेऊ नये. संजय निराधार योजनेमध्ये एखादी महिला बसत असली, त्या महिलेला लाडका बहिणीचा लाभ नाही. काही बहिणी या दुसऱ्या योजनेमध्ये बसत असल्यामुळे त्यांना लाभ द्यायचा नाही हे धोरण पहिले पासून होतं. दुसऱ्या योजनेमध्ये महिन्याचे हजार रुपये येत असतील तरी पाचशे रुपये आम्ही देतो आहे. आम्ही लाडक्या बहिणींचे पैसे कट करत नाही. मूळ एकाच व्यक्तीला दोन लाभ मिळू नये हे धोरण होतं आणि त्या धोरणाप्रमाणे आम्ही काम करतोय. त्यामुळे लाडक्या बहिणींना आम्ही सोडलं हे म्हणण्यापेक्षा लाडक्या बहिणींनी यांना पद्धतशीर उपटलं त्यामुळे त्यांच्या डोळ्यात तेच दिसतंय.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment