---Advertisement---

Jalgaon News : घरफोडीतील संघटित गुन्हेगार जेरबंद, चोरीची विक्री केलेली स्क्रैप कॉपर जप्त

---Advertisement---

Jalgaon News : एमआयडीसी परिसरातून सुमारे ३५० किलो वजनाचे जुने स्क्रैप कॉपर तसेच १५० किलो वजनाची नवीन कॉपर वायर, असा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला होता. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे एमआयडीसी पोलिसांनी एका संशयिताला रणछोडदासनगर येथून राहत्या घरातून ताब्यात घेतले. तर त्याच्या दुसऱ्या साथीदाराचा पाठलाग करून त्याला रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून शिताफीने पकडले.

एमआयडीसीत जगवानी नगरच्या गेटसमोर दुकान नं. चारचे शटर उचकवून चैनल गेट कट करून त्यातून आत प्रवेश केला. त्यानंतर ६५ हजार रुपये किमतीचे जुने स्क्रैप कॉपर एकूण सहा गोण्या, अंदाजे ३५० किलो वजन. किंमत १ लाख २० हजार रुपयांचे तसेच नवीन कॉपर अंदाजे दीडशे किलो वजनाच्या वायरी असा एकूण १ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला न नेला होता. या प्रकरणी तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार यांना सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस शिपाई राहुल घेटे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे रितेश संतोष आसेरी (वय ४६, रा. पंचमुखी हनुमान मंदिरामागे रणछोडदासनगर) याला त्याच्या राहत्या घरातून सापळा स्वून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने पथकाला गुन्ह्याची कबुली दिली. तसेच रणजितसिंग जीवनसिंग जुन्नी (वय ३२) हा साथीदार या गुन्ह्यात सोबत होता, अशी कबुली दिली. त्यानुसार पथकाने सापळा रचून रामानंदनगर पोलीस ठाणे हद्दीतून पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

कोठडी मिळाल्यानंतर ५४ हजार रुपये किमतीचे १०० किलो वजनाचे जुने तसेच नवीन तांब्याचे तार असा विक्री केलेला मुद्देमाल संशयितांकडून पथकाने हस्तगत केला. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनात पो. नि. संदीप पाटील, उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, हवालदार गणेश शिरसाळे, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पो. कॉ. नितीन ठाकूर, राहुल घेटे, किरण पाटील, राकेश बच्छाव, एलसीबीचे अंमलदार, साहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, रवि नरवाळे, अक्रम शेख यांनी ही घटना उघडकीस आणली.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment