---Advertisement---

अमळनेरात मालगाडीचे डबे घसरले, सुदैवाने जीवितहानी टळली

by team
---Advertisement---

अमळनेर : शहरातून मालगाडी घसरल्याची घटना समोर आली आहे. गुरुवार, १५ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास प्रताप महाविद्यालयाजवळ ही दुर्घटना घडली. या प्रकाराने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पाहावयास मिळाले. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही.

मालगाडीचे लोको पायलट व गार्ड हे पूर्णतः सुरक्षित असून त्यांना कोणतीही इजा झाली नाही, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, अपघातात काही डब्बे रुळावरून घसरून खाली पडले. यामुळे मुख्य रेल्वे ट्रॅकसह शेजारील ट्रॅकचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरून धावणाऱ्या अनेक प्रवासी गाड्या प्रभावित होणार असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

घटनास्थळ हे अमळनेर रेल्वे स्टेशनपासून काही अंतरावरच असल्याने रेल्वे प्रशासन, पोलीस अधिकारी व यंत्रणा तत्काळ घटनास्थळी दाखल झाली आहे. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही. याबाबत विचारणा केली असता रेल्वे अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास नकार दिला.

दरम्यान, रेल्वे अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातग्रस्त मालगाडी हटवण्याचे आणि ट्रॅक दुरुस्त करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment