---Advertisement---

Jalgaon News : खडसेंनी कोथळी ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकून दाखवावी, मंत्री गिरीश महाजन यांचे खुले आव्हान

---Advertisement---

Jalgaon News : मंत्री कोण? पालकमंत्री कोण? आम्ही कोणत्या खात्यावर राहायचे हे आम्ही आमचे बघून घेऊ. खडसेंनी आपल्या कोथळी गावातील किमान आपली ग्रामपंचायत, एखादी नगरपालिका निवडणूक जिंकून दाखवावी, मग आमच्याशी बोलावे, असे खुले आव्हान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना दिले.

शहरातून शुक्रवारी (१६ मे) भारतीय सैन्याला पाठिंबा म्हणून तिरंगा यात्रा काढण्यात आली, त्या वेळी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री महाजन यांनी आमदार एकनाथ खडसेंसह शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडले. आमदार खडसे यांनी पालकमंत्रिपद मिळविण्यावरून राज्यातील मंत्र्यांवर टीका केली होती. त्याला मंत्री महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची ईडी कोठडी आणि जेलमधील वास्तव्य यांच्या अनुभवावर आधारित असलेले ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकाचे उद्या प्रकाशन होणार आहे. राऊतांनी या पुस्तकातून विविध विषयांवर भाष्य केले असून एका भागात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबद्दलही काही दावे केले आहेत. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांनी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृहराज्यमंत्री अमित शहा यांना कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन मदत केली होती.

नरेंद्र मोदी हे गुजरात दंगलीप्रकरणी एक आरोपी होते, शरद पवार यांच्यामुळे मोदींची अटक टळली, तर तडीपार असलेल्या
अमित शहा यांनाही बाळासाहेब ठाकरेंनी मदत केल्याचा दावा या पुस्तकातून करण्यात आल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. पण त्यांच्या या दाव्यांवर भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली आहे. तसेच राऊत यांचे दावे महाजन यांनी फ टाळून लावले आहेत.

मंत्री महाजन म्हणाले की, संजय राऊत यांच्याबद्दल काय बोलावं ? ते काय बोलतात हे आता कोणी ऐकतसुद्धा नाही. वाट्टेल तशी फालतू बडबड ते करीत असतात. युद्ध सुरू असताना मोदींनी राजीनामा द्यावा, अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राऊत करत होते. सैनिकांबद्दल काहीही बोलत होते. मला वाटतं आता या माणसाला कोणीच गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं असं म ला वाटतं, असं ना. गिरीश महाजन म्हणाले.

की देशांतर्गत अतिरेक्यांशी लढावं?

संजय राऊत यांना किती महत्त्व द्यायचं आणि त्यांच्या बोलण्याला आणि त्यांच्या लिहिण्याला किती महत्त्व द्यायचं हे पाहावं लागेल. आता त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यांचं कोणी ऐकत नाही. सकाळपासून त्यांचा भोंगा सुरू होतो. संपूर्ण देश हा मोदींच्या पाठीशी उभा असताना, सैन्याच्या पाठीशी उभा असताना त्या वेळी ते म्हणत होते मोदींनी राजीनामा द्यावा. आता आपण त्या अतिरेक्यांशी लढावं की देशांतर्गत असलेल्या या अतिरेक्यांशी लढावं? असा सवालही त्यांनी केला. संजय राऊत यांना अतिरेकी म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली.

महत्त्व देण्याची गरज नाही

मला वाटतं या पुस्तकाला आपण किती महत्त्व द्यावं. संजय राऊत कसा माणूस आहे हे सर्वांना माहीत आहे. पुस्तकात त्यांनी काय लिहिलं आहे ते मी वाचलेलं नाही आणि वाचणारही नाही. मला वाटतं त्याला फार महत्त्व देण्याची गरजसुद्धा नाही. असंही त्यांनी स्पष्ट केलं.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment