---Advertisement---

Nandurbar Accident : बसने रिक्षाला उडविले, एकाचा जागीच मृत्यू

---Advertisement---

नंदुरबार : भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने रिक्षाला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शहादा वळण रस्त्यावरील पाटीदार मंगल कार्यालयासमोर घडली. रमेश दशरथ शिरसाठ ( ४४) असे मृताचे नाव आहे. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

शहादा वळण रस्त्यावरील पाटीदार मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगाने जाणाऱ्या बसने (एमएच १४- बी.टी. १८००) रिक्षाला (एम.एच. १८ एन. ७९२९) जोरदार धडक दिली. या अपघातात रमेश दशरथ शिरसाठ (वय ४४) यांचा मृत्यू झाला. रमेश शिरसाठ यांना डाव्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बसचालक नरेंद्र विजय कोळी यांच्या विरोधात मृताचे नातेवाईक आकाश सुनील शिरसाठ यांनी शहादा पोलिसात फिर्याद दिली. पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असन पन्त्रील तपास पोलिस रतालटार तसंत नागमल करीत आहेत.

अपघातात महिलेचा मृत्यू

नंदुरबार : भरधाव दुचाकीने महिलेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची घटना देवमोगरा पुनर्वसन, ता. अक्कलकुवा येथे घडली. दुचाकीचालकाविरुद्ध अक्कलकुवा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमकाबाई नोबल्या पाडवी (वय ६५, रा. देवमोगरा पुनर्वसन, ता. अक्कलकुवा) असे मयत महिलेचे नाव आहे. भरधाव आलेल्या दुचाकी (जीजे २२ आर ५७२६)ने त्यांना धडक दिली. यात त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दारसिंग सोकना पाडवी विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment